असा कसा हाेईल परिसंस्थेचा जीर्णाेद्धार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:36+5:302021-06-05T04:07:36+5:30

तलावांची स्थिती वाईट नीरीचा अहवाल तलावांबाबत चिंता करायला भाग पाडणारा आहे. फुटाळा, गांधीसागर, सोनेगावांनी प्रदूषणाची सीमा पार केली आहे. ...

How will the ecosystem be restored? | असा कसा हाेईल परिसंस्थेचा जीर्णाेद्धार?

असा कसा हाेईल परिसंस्थेचा जीर्णाेद्धार?

Next

तलावांची स्थिती वाईट

नीरीचा अहवाल तलावांबाबत चिंता करायला भाग पाडणारा आहे. फुटाळा, गांधीसागर, सोनेगावांनी प्रदूषणाची सीमा पार केली आहे. सक्करदरा व नाईक तलावाचे अस्तित्वच संकटात आहे. केवळ अंबाझरी तलावाची स्थिती समाधानकारक आहे. सर्व तलावांचे सर्व प्रकारचे प्रदूषण वाढीस लागले आहे. गढूळपणा, आम्लपणा, पाण्याची कठीणता, सल्फेट, नायट्रेट, फॉस्फेट, धातू-अधातूंचे प्रमाण, सीओडी, बीओडी आणि कॉलिफॉर्म आदी सर्व प्रकारच्या घटकांची तलावांच्या पाण्यात वाढ झाली आहे. घराघरातील सिव्हेज, गटार आणि फेकला जाणारा कचरा हे या प्रदूषणाचे प्रमुख कारण आहेत.

- अंबाझरी तलावात मासे व जैवविविधतेचे समाधानकारक अस्तित्व.

- सर्व तलावांत कॉलिफॉर्मचे प्रमाण अधिक. कॉलिफॉर्म मानवी शरीरातील घटक असून, त्याच्या असण्याने सिव्हेज वाहत असल्याचे लक्षात येते. नाईक तलावात कॉलिफॉर्म ४८० ते ४९० मिग्रॅ/ली. अत्याधिक धोक्यात.

- सोनेगाव, गांधीसागर, अंबाझरीमध्ये सीओडी व बीओडी अधिक.

- सक्करदरा, गांधीसागरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ्लोराइड, क्लोराइड आदी पोषण घटकांचे प्रमाण अत्याधिक.

- सर्व तलावात मेटल्सचे प्रमाणही वाढत आहे.

Web Title: How will the ecosystem be restored?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.