बोर्डाकडून मार्कलिस्टचा घोळ : शाळा-महाविद्यालयांची ओरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 09:24 PM2019-06-12T21:24:56+5:302019-06-12T21:31:52+5:30
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता निकालाची प्रत (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शिक्षण मंडळ पुणे येथून निकालाच्या प्रति विभागीय मंडळामध्ये पाठविण्यात आल्या असून, आता शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहचल्या आहेत. पण कुठे जास्त तर कुठे कमी गुणपत्रिका पोहचल्या असल्याची ओरड शाळा-महाविद्यालयांमधून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता निकालाची प्रत (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शिक्षण मंडळ पुणे येथून निकालाच्या प्रति विभागीय मंडळामध्ये पाठविण्यात आल्या असून, आता शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहचल्या आहेत. पण कुठे जास्त तर कुठे कमी गुणपत्रिका पोहचल्या असल्याची ओरड शाळा-महाविद्यालयांमधून होत आहे.
बोर्डातर्फे निकाल ऑनलाईन प्रसिद्ध केल्यानंतर काही दिवसानंतर गुणपत्रिका शाळांना पाठविण्यात येते. बारावीच्या गुणपत्रिका शाळा, महाविद्यालयांमध्ये आता पोहचल्या आहेत. काही शाळांमध्ये प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांएवढ्या गुणपत्रिका पाठविण्यात आल्या नाही. एका शाळेच्या गुणपत्रिका दुसऱ्या शाळेत असेही प्रकार घडलेले आहे. यासंदर्भात मुख्याध्यापकांनी बोर्डाकडे तक्रारी केल्या आहेत. बोर्डाकडून आवाहन करण्यात आले की, ज्या शाळेमध्ये अधिक गुणपत्रिका आल्या असतील, त्यांनी बोर्डात जमा कराव्यात.
पण मुद्दा हा आहे की, असा ढिसाळपणा होतोच कसा. गेल्यावर्षी एका शाळेच्या गुणपत्रिका दुसºया शाळेत, काही विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाच मिळाल्या नाही, असेही प्रकार घडले होते. यंदाही याच तक्रारी वाढल्या आहेत. बोर्डाकडे गुणपत्रिका परत न आल्यास पुन्हा विभागीय मंडळ अशा विद्यार्थ्यांची यादी पुण्याच्या मंडळाकडे पाठविणार आहे.