HSC Result 2022 : नागपूर विभागाची झेप, राज्यात दुसऱ्या स्थानी; ९६.५२ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 05:55 PM2022-06-08T17:55:22+5:302022-06-08T18:15:25+5:30

सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. राज्यात नागपूर विभागाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण विभागाची आकडेवारी ९६.५२ टक्के इतकी आहे.

HSC Result 2022: nagpur division ranks second in maharashtra with 96.5 percentage | HSC Result 2022 : नागपूर विभागाची झेप, राज्यात दुसऱ्या स्थानी; ९६.५२ टक्के निकाल

HSC Result 2022 : नागपूर विभागाची झेप, राज्यात दुसऱ्या स्थानी; ९६.५२ टक्के निकाल

Next
ठळक मुद्देगुणवंतांमध्ये पुन्हा मुलींचीच बाजी

नागपूरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ३.१ टक्क्यांनी घटला असला तरी राज्यात विभागाने झेप घेतली आहे. राज्यात विभागाचा दुसरा क्रमांक आहे. संपूर्ण विभागाची आकडेवारी ९६.५२ टक्के इतकी आहे.

विभागात एकूण १ लाख ५९ हजार १०६ पैकी १ लाख ५३ हजार ५८४ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले. नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७७ हजार ७७९ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ७५ हजार ८१२ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९७.४७ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.६२ टक्के इतके आहे. सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले.

नियमित विद्यार्थ्यांची विभागीय आकडेवारी

अभ्यासक्रम : परीक्षार्थी : उत्तीर्ण : टक्केवारी

विज्ञान : ७४,०९२ : ७३,५८४ : ९९.३१

कला : ५७,२७९ : ५३,५११ : ९३.४२

वाणिज्य : २०,७०८ : १९,८३५ : ९५.७८

एमसीव्हीसी : ६,८६९ : ६,५२८ : ९५.०३

विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’

नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून १९ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १९ हजार ३९६ म्हणजेच ९७.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्यातून ६२३ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व यातील ६१ हजार २५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९६.६५ टक्के इतकी आहे. विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी वर्धा जिल्ह्याची आहे. तेथे १७ हजार १० पैकी १६ हजार २२३ म्हणजे ९५.३७ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.

जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारी

जिल्हा : निकाल टक्केवारी

भंडारा : ९७.३०%

चंद्रपूर : ९६.१० %

नागपूर : ९६.६५%

वर्धा : ९५.३७ %

गडचिरोली : ९६.००%

गोंदिया : ९७.३७ %

Web Title: HSC Result 2022: nagpur division ranks second in maharashtra with 96.5 percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.