नागपुरातील जंगल्याजी धोंडबाजी फर्मच्या गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 08:56 PM2020-06-16T20:56:37+5:302020-06-16T20:58:51+5:30

शहरातील पेंट, तिरपाल, नायलॉन रस्सी, धागे आदींच्या ठोक विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या इतवारी परिसरातील बांगरे मोहल्ला चुना ओळी येथील जंगल्याजी धोंडबाजी फर्म राहुल इंटरप्रायजेसच्या चारमजली गोदामाला मंगळवारी पाहाटे ४.५५ च्या सुमारास भीषण आग लागली.

A huge fire broke out at the warehouse of Jangalyaji Dhondbaji firm in Nagpur | नागपुरातील जंगल्याजी धोंडबाजी फर्मच्या गोदामाला भीषण आग

नागपुरातील जंगल्याजी धोंडबाजी फर्मच्या गोदामाला भीषण आग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील पेंट, तिरपाल, नायलॉन रस्सी, धागे आदींच्या ठोक विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या इतवारी परिसरातील बांगरे मोहल्ला चुना ओळी येथील जंगल्याजी धोंडबाजी फर्म राहुल इंटरप्रायजेसच्या चारमजली गोदामाला मंगळवारी पाहाटे ४.५५ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दहा गाड्या घटनास्थळी पोहचल्या. परंतु वरच्या मजल्यावरील आग विझविण्याचे कार्य रात्रीपर्यंत सुरू होते.
या गोदामाच्या आजूबाजूला व्यापारी परिसर असल्यामुळे इतरत्र दुकानांमध्ये ही आग परण्याची भीती होती. मात्र अग्निशमन विभागाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. माहितीनुसार मेमन जमातपुढील देशी दारू दुकानाजवळील अशोक नाचनकर परिवार यांची चारमजली इमारत आहे. तिचा दुकान व गोदाम म्हणून वापर केला जातो. इमारतीत आग लागल्यानंतर काही वेळात ती चौथ्या माळ्यापर्यंत पोहचली. इमारतीत पेंट तयार केला जात असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या केमिकलमुळे आगीने रौद्ररूप धारण केले.
या इमारतीत पहिल्या माळ्यावर दुकान तर वरच्या माळ्यांना गोदामाचे स्वरूप दिले आहे. या गोदामात कोट्यवधी रुपयांचा पेंट, नायलॉन रस्सी आदी सामान ठेवण्यात आले होते. ही सर्व सामग्री लवकर आग पकडणारी असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे भीषण रूप घेता अग्निशमन विभागाला माहिती मिळताच दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु, हा परिसर अरुंद असल्यामुळे विभागाच्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना पुढे जावे लागले. अशातच, आग झपाट्याने वाढत असल्यामुळे आणखी दहा बंब घटनास्थळी पोहचले. अग्निशमन विभागाचे अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. आग नियंत्रणात असली तरी वरच्या माळ्यावर ती रात्री उशिरापर्यंत धुमसत होती. अखेर ७ तास शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.

नाचनकर कुटुंबावर दहा दिवसात दुसरे संकट
नाचनकर कुटुंबातील सदस्य गणेश नाचनकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. मंगळवारी त्यांची दशक्रिया होती. याकरिता नाचनकर कुटुंबीय हे रामटेक येथे जाणार होते. परंतु, त्यापूर्वीच आगीची घटना घडली. नाचनकर कुटुंबीयांवर दहा दिवसातच दुसरे संकट कोसळले.

Web Title: A huge fire broke out at the warehouse of Jangalyaji Dhondbaji firm in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.