मानवाधिकार आयोगाची नागपूर पोलीस आयुक्तांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 01:07 AM2018-12-25T01:07:09+5:302018-12-25T01:09:20+5:30

मनीषनगरात १२ जून २०१४ ला मिळालेल्या मानवी सांगाड्याप्रकरणात मानवाधिकार आयोगाने पोलीस आयुक्तांना नोटीस पाठविली आहे. २७ डिसेंबरला पोलिसांची बाजू मानवाधिकार आयोगापुढे ठेवण्याचे निर्देश या नोटीसमधून देण्यात आले आहेत.

Human Rights Commission Notice to the Police Commissioner of Nagpur | मानवाधिकार आयोगाची नागपूर पोलीस आयुक्तांना नोटीस

मानवाधिकार आयोगाची नागपूर पोलीस आयुक्तांना नोटीस

Next
ठळक मुद्देमनीषनगर मानवी सांगाडा प्रकरण

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनीषनगरात १२ जून २०१४ ला मिळालेल्या मानवी सांगाड्याप्रकरणात मानवाधिकार आयोगाने पोलीस आयुक्तांना नोटीस पाठविली आहे. २७ डिसेंबरला पोलिसांची बाजू मानवाधिकार आयोगापुढे ठेवण्याचे निर्देश या नोटीसमधून देण्यात आले आहेत.
मनीषनगरात पंचतारा सोसायटीच्या सुरक्षा भिंतीजवळ असलेल्या गटारात १२ जून २०१४ ला एक मानवी सांगाडा मिळाला होता. तत्कालीन ठाणेदार शहा आणि पोलीस उपनिरीक्षक राऊत यांनी त्यावेळी हा सांगाडा रेल्वे लाईनजवळच्या खुल्या जागेत खड्डा करून पुरला होता. तो सांगाडा जनावराचा असल्याचेही त्यावेळी पोलिसांनी म्हटले होते. मात्र, तो सांगाडा एका तरुणाचा असल्याचे नंतर स्पष्ट झाले. वृत्तपत्रातून हे प्रकरण लावून धरण्यात आल्याने तत्कालीन दिवंगत गृहमंंत्री आर. आर. पाटील यांनी कसून चौकशीचे आदेश दिले होते. त्यावेळी पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून काही जणांनी हे प्रकरण मानवाधिकार आयोगाकडे तक्रारीच्या रूपाने नेले होते. त्या पार्श्वभूमीवर आता मानवाधिकार आयोगाने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना नोटीस पाठवून प्रकरणात पोलिसांची बाजू २७ डिसेंबरला आयोगापुढे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Human Rights Commission Notice to the Police Commissioner of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.