अवयवदानातून मानवतेचे दर्शन

By admin | Published: August 15, 2015 02:55 AM2015-08-15T02:55:24+5:302015-08-15T02:55:24+5:30

स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यावर इतक्या वर्षांनंतर आपण एकविसाच्या शतकातल्या दीड दशकाच्या उंबरठ्यावर आहोत,

Humanity's philosophy of organism | अवयवदानातून मानवतेचे दर्शन

अवयवदानातून मानवतेचे दर्शन

Next

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मेश्राम कुटुंबीयांचा संकल्प : २८ जणांनी भरला अवयवदानाचा अर्ज
सुमेध वाघमारे नागपूर
स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यावर इतक्या वर्षांनंतर आपण एकविसाच्या शतकातल्या दीड दशकाच्या उंबरठ्यावर आहोत, परंतु आजही अवयवदानाची चळवळ बाल्यावस्थेतच आहे. यामुळेच वेळेत अवयवदानासाठी दाता मिळाला असता व अवयव प्रत्यारोपण झाले असे तर कदाचित ते वाचले असते, असे वृत्त आपण ऐकतो, वाचतो, हळहळतो. मात्र, अवयव दान करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. आज भारतात हजारो लोक अवयवदनासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आयुष्याचे अखेरचे क्षण मोजत आहेत. उपराजधानीत तर २००वर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. याची दखल घेत मरणोत्तर देहदानाचा आणि मेंदू मृत झाल्यानंतर अवयवदानाचा संकल्प एकाच कुटुंबातील २८ जणांनी केला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला ७५ वर्षांच्या आजोबांपासून ते २ वर्षाच्या नातवंडापर्यंत सर्वांनी मिळून या महादानासाठी अर्ज भरला. त्यांच्या या संकल्पनेने स्वातंत्र्यदिनाला नवा अर्थ प्राप्त झाला. हिंगणा येथील मेश्राम ले-आऊट येथील रहिवासी असलेले गंगाराम मेश्राम यांचे हे कुटुंब आहे. त्यांना ही प्रेरणा ‘जागतिक अवयव दानदिनी’ ‘लोकमत’ने आवाहन केलेल्या वृत्तातून मिळाली आहे.
म्हणावी तशी जागृती नाही
अवयवदानातून मानवतेचे दर्शन

नागपूर : अवयवदानातून दुसऱ्यांना जीवनदान करण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत अजूनही म्हणावी तशी जागृती झालेली नाही. सरकार, स्वयंसेवी संस्थांकडून या जागृतीसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे.
यामुळे आताशा थोडेफार लोक अवयवदानासाठी पुढे येऊ लागले असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु ते व्यापक होण्यासाठी हा संकल्प केल्याचे मेश्राम कुटुंबाचे मुख्य असलेले ७५ वर्षीय गंगाराम मेश्राम यांनी सांगितले. या अभिनव संकल्पनेबाबत त्यांचा मुलगा व सेवादल महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख प्रा. सुशील मेश्राम म्हणाले, इंग्रजांपासून स्वातंत्र्य ही गोष्ट जुनी झाली आहे. दरवर्षी त्यात नवा अर्थ भरणे आवश्यक आहे. त्यातून स्वातंत्र्याला नवनवीन अर्थ व उत्साह प्राप्त होतो. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सदस्य आहे. सुरुवातीपासूनच अवयवदानाची संकल्पना मनात खदखदत होती. परंतु कुणासमोर बोलून दाखविली नाही.
माझे वडील गंगाराम मेश्राम, त्यांचे दोन भाऊ चंदू मेश्राम (६४) व गोपाल मेश्राम (६१) त्यांच्या पत्नी, मुले, नातवंड असे २८ जणांचे आमचे संयुक्त कुटुंब आहे. सर्वात लहान कुशल विशाल मेश्राम हा दोन वर्षांचा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Humanity's philosophy of organism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.