तरुणीसह महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:08 AM2021-04-25T04:08:12+5:302021-04-25T04:08:12+5:30

- पीडितेच्या पतीला आरोपींकडून मारहाण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लकडगंज व नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीसह एका महिलेचा ...

Humiliation of a woman with a young woman | तरुणीसह महिलेचा विनयभंग

तरुणीसह महिलेचा विनयभंग

Next

- पीडितेच्या पतीला आरोपींकडून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लकडगंज व नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीसह एका महिलेचा विनयभंग केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. लकडगंज परिसरात शुक्रवारी रात्री ८ वाजता ३० वर्षीय महिला घरासमोर बसली होती. दरम्यान, आरोपी हरीश माधवराव गौरकर (वय ४०, रा. बालाजी मंदिर रोड) याने महिलेच्या घरासमोर बसून अश्लील इशारे करण्यास सुरुवात केली. प्रारंभी महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आरोपीने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत महिलेच्या पतीने आरोपी हरीशला समज दिली. मात्र, आरोपीने महिलेच्या पतीच्या तोंडावर वीट मारून जखमी केले. सोबतच त्यांच्या कारच्या काचा फोडल्या. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या एका घटनेत नंदनवन परिसरात २८ वर्षीय तरुणीला गुरुवारी रात्री ८ वाजता तिच्या ओळखीच्या युवकाने थांबवून धमकावले. आरोपी नितीन इंगळे (३२) हा आहे. तरुणीचा काहीच दिवसांपूर्वी साक्षगंध झाला आहे. तेव्हापासून तिने आरोपी नितीनसोबत बोलचाल बंद केली होती. परंतु, नितीन तिचा पाठलाग करत होता. गुरुवारी नितीनने तरुणीला थांबवून तिचे फोटो तिच्या भावी पतीला पाठवून विवाह तोडण्याचा इशारा दिला. फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

-----------------

बॉक्स..

अल्पवयीन मुलीला मैत्री करण्यासाठी धमकावले

शांतीनगर परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला मैत्री ठेवण्यास व फोनवर बोलण्याची जबरदस्ती करणाऱ्या युवकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आराेपी तुषार नेहारे (२१) हा आहे. १९ फेब्रुवारीपासून आरोपी तुषार अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता.

..............

Web Title: Humiliation of a woman with a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.