नागपुरात  शेतकऱ्यांचे हास्य योग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:49 AM2018-06-22T00:49:12+5:302018-06-22T00:49:26+5:30

The humorous Yoga movement of farmers in Nagpur | नागपुरात  शेतकऱ्यांचे हास्य योग आंदोलन

नागपुरात  शेतकऱ्यांचे हास्य योग आंदोलन

Next
ठळक मुद्देसरकारच्या फसव्या धोरणाचा व घोषणांचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : मोदी सरकारच्या पुढाकाराने २१ जून जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे. सरकारला चार वर्ष झाले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. पिकाला हमी भाव देऊ, उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव देऊ, शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करू, सातबारा कोरा करू, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे आश्वासन दिले होते. परंतु सरकारचे आश्वासन खोटे ठरले. त्यामुळे योग दिवसांच्या निमित्त शासनाचा निषेध म्हणून कळमना धान्य बाजारात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हास्य योग करून निषेध केला. यावेळी संजय सत्येकार शेतकरी नेते, भगवानदास यादव, नारायण ठाकरे, आशिष पाटील, राजू गुडधे, ज्ञानेश्वर चकोले, विष्णू आगासे, सचिन वानखेडे आदी उपस्थित होते.

Web Title: The humorous Yoga movement of farmers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.