शेकडो अनुयायी बौद्ध धम्माच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:28 AM2017-09-29T01:28:36+5:302017-09-29T01:28:51+5:30

बौद्ध धम्म प्रज्ञा, करुणा, समता शिकविते. या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. म्हणूनच दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन केले जाते.

 Hundreds of followers are on the way to Buddhism | शेकडो अनुयायी बौद्ध धम्माच्या वाटेवर

शेकडो अनुयायी बौद्ध धम्माच्या वाटेवर

Next
ठळक मुद्देपहिल्याच दिवशी दोन हजार अनुयायांनी घेतली दीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बौद्ध धम्म प्रज्ञा, करुणा, समता शिकविते. या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. म्हणूनच दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षीही या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी पहिल्याच दिवशी दोन हजारांवर बाबासाहेबांच्या अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो बांधवांसह नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन देशात एक नवी धम्मक्रांती केली होती. या ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी यांच्यावतीने बौद्ध दीक्षा-विधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध धम्मगुरु भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ५०० वर श्रामणेर व दोन हजार अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. यावेळी श्रामणेर झालेल्यांना चिवर दान देण्यात आले. दीक्षा देण्याचा हा कार्यक्रम ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. भदन्त सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली व दीक्षाभूमी स्मारक समितीचे कार्यवाह सदानंद फुलझेले यांच्या उपस्थितीत अनुयायांना दीक्षा दिली जात आहे.
प्रारंभी बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर अनुयायांना २२ प्रतिज्ञाचे वाचन करावयास लावले. श्रामणेर यांना पंचशीलचे महत्त्व सांगून ते आत्मसात करण्यास सांगण्यात आले. गुरुवारी श्रामणेरची दीक्षा घेतलेल्यांमध्ये १२ वर्षीय मुलापासून ते ५५ वर्षीय अनुयायांचा समावेश होता. धम्म दीक्षा घेण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, चेन्नई, कोलकाता, मराठवाडा, नाशिक, मुंबई व महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून लोक आले आहेत. दीक्षेच्या या कार्यक्रमात स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे परिश्रम घेत आहेत.

Web Title:  Hundreds of followers are on the way to Buddhism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.