भंगारवाल्याकडे सापडले तब्बल शंभरावर आधारकार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 07:45 AM2022-02-15T07:45:00+5:302022-02-15T07:45:02+5:30

Nagpur News आधारकार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला त्याची ओळख मिळाली आहे. अत्यंत महत्त्वाचे असलेले हे दस्तावेज मेकोसाबाग येथे एका भंगारवाल्याकडे मोठ्या संख्येने आढळले आहे.

Hundreds of Aadhaar cards found at Bhangarwala | भंगारवाल्याकडे सापडले तब्बल शंभरावर आधारकार्ड

भंगारवाल्याकडे सापडले तब्बल शंभरावर आधारकार्ड

googlenewsNext
ठळक मुद्दे२० रुपये घेऊन देत होता परत संबंधितांचा निष्काळजीपणा उघड

विशाल महाकाळकर

नागपूर : आधारकार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला त्याची ओळख मिळाली आहे. अत्यंत महत्त्वाचे असलेले हे दस्तावेज मेकोसाबाग येथे एका भंगारवाल्याकडे मोठ्या संख्येने आढळले आहे. हा भंगारवाला या आधारकार्डची विक्री २० रुपयांना करीत आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आधारकार्ड बनविणाऱ्या आणि ती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणाऱ्या या संपूर्ण यंत्रणेतील निष्काळजीपणा उघडकीस झाली आहे.

जरीपटका भागातील मेकोसाबाग ख्रिश्चन कॉलनीत राहणाऱ्या एका भंगारवाल्याकडे किमान १५० च्या जवळपास आधारकार्ड आहे. या आधारकार्डवर असलेल्या नंबरवर तो लोकांना फोन करून प्रतिकार्ड २० रुपयांची मागणी करीत होता. ही बाब प्रभात अग्रवाल यांना समजल्यानंतर त्यांनी याबाबत चौकशी केली असता, हे आधारकार्ड भंगार व्यावसायिकाला कचरा वेचणाऱ्यांकडून मिळाल्याचे त्याने सांगितले. यातील बहुतांश आधारकार्ड हे उत्तर नागपुरातील नागरिकांचे होते. भंगारवाला आधारवरील लोकांना संपर्क करून २० रुपयाला विकत होता. इतके महत्त्वाचे दस्तावेज भंगारात मिळण्याचा हा प्रकार अतिशय धोकादायक आहे.

- पोस्टमनवर संशय

आधारकार्डसाठी नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीची माहिती यूएडीएआयच्या पोर्टलवर जाते आणि डाक विभागाच्या माध्यमातून आधारकार्ड घरापर्यंत पोहोचते. या प्रकरणात ज्या पोस्टमनकडे हे आधारकार्ड संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर पोहोचविण्याची जबाबदारी होती. त्यांनी ते लोकांपर्यंत न पोहोचविता कचऱ्यात टाकले असतील, असाही संशय व्यक्त केला जातो.

- इतके महत्त्वाचे असलेले दस्तावेज भंगारात सापडत असतील, तर या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने चौकशी करणे गरजेचे आहे. यात जो कुणी दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

प्रभात अग्रवाल, संघटक मध्य नागपूर, आम आदमी पार्टी

Web Title: Hundreds of Aadhaar cards found at Bhangarwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.