पेट्रोलची शंभरीकडे वाटचाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 AM2021-05-07T04:08:44+5:302021-05-07T04:08:44+5:30
नागपूर : गेल्या तीन दिवसांत पेट्रोल प्रति लिटर ४२ पैसे आणि डिझेल ५२ पैशांनी महाग झाले असून ६ मे ...
नागपूर : गेल्या तीन दिवसांत पेट्रोल प्रति लिटर ४२ पैसे आणि डिझेल ५२ पैशांनी महाग झाले असून ६ मे रोजी पेट्रोल ९७.२२ रुपये आणि डिझेल ८७.०५ रुपयांवर पोहोचले आहे. मध्यंतरी सव्वा रुपयांनी कमी झालेले पेट्रोलचे दरदिवशी वाढत असल्याने साधे पेट्रोल शंभरीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे. टर्बो अर्थात सुपर पेट्रोलने आधीच शंभरी गाठली आहे.
पाच राज्यातील निवडणुकांदरम्यान पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर होते. पण निकाल लागल्यानंतर दरदिवशी काही पैशांनी वाढ होत आहे. ४ मे रोजी पेट्रोल ९६.८० रुपये व डिझेल ८६.५३ रुपये होते. ५ मे रोजी पेट्रोल व डिझेलमध्ये अनुक्रमे २८ पैसे व २१ पैशांची वाढ होऊन पेट्रोल ९७.०८ रुपये व डिझेल ८६.७४ रुपयांवर पोहाचले. ६ मे रोजी पुन्हा दरवाढ होऊन पेट्रोल ९७.२२ रुपये आणि डिझेल ८७.०५ रुपयांवर गेले. वाढत्या महागाईत वाहनचालकांना दरवाढीचा फटका बसत आहे.