शेकडोंच्या संख्येने हिंगणघाट येथील पीडितेला श्रद्धांजली : कॅन्डल मार्चचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 09:13 PM2020-02-13T21:13:20+5:302020-02-13T21:14:52+5:30
हिंगणघाट येथील पीडितेवर झालेल्या क्रूर हल्ल्यामुळे समाजमन हळहळले आहे. या घटनेचा सर्व शाखीय कुणबी समाज संघटनेने निषेध नोंदविला. पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कुणबी समाज भवनापासून शेकडोंच्या संख्येने कॅन्डल मार्च काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंगणघाट येथील पीडितेवर झालेल्या क्रूर हल्ल्यामुळे समाजमन हळहळले आहे. तिच्या जाण्याने महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका अबलेवर असा क्रूर अत्याचार होणे ही समाजाला काळिमा फासणारी बाब आहे. या घटनेचा सर्व शाखीय कुणबी समाज संघटनेने निषेध नोंदविला. पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कुणबी समाज भवनापासून शेकडोंच्या संख्येने कॅन्डल मार्च काढला.
महाल येथील अखिल कुणबी समाज भवन येथून कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री परिणय फूके, कॉंग्रेस नेता गिरीश पांडव, माजी आमदार सुधाकर कोहळे, नगरसेविका मंगला खेकरे, रमेश शिंगारे, नरेंद्र जिचकार, राजेश काकडे, जिल्हा परिषद सदस्य अनिल निदान, अजय बोढारे यांची प्रमुख उपस्थिती होती. पीडितेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मार्चला सुरुवात झाली. मार्चमध्ये सहभागी शेकडो कुणबी समाज बांधवांनी हातात मेणबत्ती घेऊन पीडितेच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रार्थना केली. कॅन्डल मार्च अखिल कुणबी समाज भवन, झेंडा चौक, कल्याणेश्वर मंदिर, महाल मार्गे गांधीगेट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला. तेथे पीडितेला दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. कँडल मार्चमध्ये अखिल कुणबी समाजाचे पुरुषोत्तम शहाणे, माधव कडू, प्रल्हाद पडोळे, सुधीर शहाणे, अशोक कापसे, उदाराम फेंडर, बबन बोरकुटे, अनिल निधान, जयंत दळवी, राजेंद्र भोतमांगे, विनायक ठाकरे, राजेंद्र राऊत, राजाराम घोंगे, सरला देऊळकर, रमेश भोयर, राजेंद्र भेंडे, रमेश चिकटे, विनायक नागपुरे, अशोक वानखेडे, अल्का वांजेकर, विजय पवार, कमलेश ठवकर, बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुरेश गुडधे, अशोक पांडव, वामन येवले, गणेश चेंबर, बावणे कुणबी समाज रामनगरचे दत्तात्रय निंबर्ते, बाबाराव तुमसरे, प्रदीप बुराडे, खैरे कुणबी समाज सुधारक संस्था जुनी शुक्रवारीचे चंद्रकांत नवघरे, विजय तेलंग, झाडे कुणबी समाजाचे राजेश चुटे, किशोर पटोले, मोरेश्वर पुंडे, तिरळे कुणबी समाज लालगंज झाडे चौक येथील वासुदेव कोंगे, सुरेश जिचकार, एकनाथ काळमेघ, जाधव कुणबी समाज व कल्याणकारी संस्थेचे राजेंद्र काकडे, सतीश सातंगे, संजय भोसे, झाडे कुणबी समाजाचे वामन उमरे, हरिभाऊ भोसे, महेंद्र देशमुख, खैरे कुणबी समाजाचे डॉ. वसंत भोयर, सुरेखा रडके, डॉ. प्रदीप महाजन, महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समिती अखिल कुणबी समाजाचे राजेंद्र तिजारे, बाळा शिंगणे, अनंता भारसागडे, तिरळे कुणबी सेवा मंडळाचे रमेश चोपडे, डॉ. रमेश गोरले, कृष्णा बोराटे, धनोजे कुणबी समाज सुयोगनगरचे दिनकर जीवतोडे, अशोक निखाडे, बबन वासाडे, कुणबी सेना टिंबरमार्ट लकडगंजचे सुरेश वर्षे, बाबाराव ढोबळे, गणेश कोहपरे, प्रगतिशील तिरळे कुणबी समाजाचे राजेश घोडमारे, महेंद्र ठाकरे, अभय आचार्य, खैरे कुणबी विकास परिवाराचे नितीन मालोदे, किशोर येडे, आशिष देवतळे, खैरे कुणबी बहुउद्देशीय विकास संस्थेचे गुनेश्वर आरेकर, हेमराज माले, सुनिल मगरे, जया देशमुख, कल्पना ठवरे, मीनाक्षी ठाकरे, गजानन रामेकर, शरद इंगोले, प्रा. शरद वानखेडे, किर्तीकुमार कडु, प्रमोद वैद्य, भास्कर पांडे, दुनेश्वर आरीकर, यांच्यासह कुणबी समाजातील शिक्षक संघटना, वकील संघटना आणि डॉक्टर संघटनांचे पदाधिकारी कॅ न्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते.
आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी
‘हिंगणघाट येथील पीडितेवर झालेला हल्ला वेदनादायी आहे. या घटनेतील पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्च काढला आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी आहे.’
परिणय फुके, माजी राज्यमंत्री