राममंदिरासाठी आज हुंकार : काय बोलणार संत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:56 PM2018-11-24T23:56:06+5:302018-11-24T23:56:59+5:30

अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी, यासाठी देशभरात वातावरणनिर्मिती सुरू आहे. रविवारी अयोध्येप्रमाणे नागपुरात संघ परिवारातर्फे हुंकार करण्यात येणार आहे. क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षणमहाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या सभेला संत तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेला विदर्भातून कार्यकर्ते येणार असल्याचा दावा सभा संयोजकांनी केला आहे. दरम्यान, संघ मुख्यालयाच्या शहरात ही सभा होत असल्याने या माध्यमातून संत नेमका काय संदेश देतात, याकडे देशातील राजकीय, सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Hunkar for Ramamandir today: What will the Saint say? | राममंदिरासाठी आज हुंकार : काय बोलणार संत?

राममंदिरासाठी आज हुंकार : काय बोलणार संत?

Next
ठळक मुद्दे विहिंप पदाधिकारी राहणार उपस्थित : विदर्भातून कार्यकर्ते येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी, यासाठी देशभरात वातावरणनिर्मिती सुरू आहे. रविवारी अयोध्येप्रमाणे नागपुरात संघ परिवारातर्फे हुंकार करण्यात येणार आहे. क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षणमहाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या सभेला संत तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेला विदर्भातून कार्यकर्ते येणार असल्याचा दावा सभा संयोजकांनी केला आहे. दरम्यान, संघ मुख्यालयाच्या शहरात ही सभा होत असल्याने या माध्यमातून संत नेमका काय संदेश देतात, याकडे देशातील राजकीय, सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२५ नोव्हेंबर रोजी बंगळुरू व अयोध्या येथे हुंकार सभा होणार आहे. क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी ३ वाजता ही सभा होईल. या सभेला ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती, साध्वी ऋतुंभरा, देवनाथ पीठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज, विहिंपचे कार्याध्यक्ष आलोककुमार प्रामुख्याने उपस्थित राहतील.
सरकारवर दबाव आणण्यासाठी पाऊल
राममंदिर व्हावे ही देशातील कोट्यवधी नागरिकांची भावना आहे. जर न्यायालयीन प्रक्रियेला उशीर लागत असेल तर सरकारने अध्यादेश जारी करावा किंवा कायदा करावा. सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर अध्यादेश जारी करून राममंदिराची उभारणी झाली पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे. सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठीच हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंचावर संघाचे पदाधिकारी नाहीत
संघ परिवारातील स्वयंसेवकांनी हुंकार सभेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मंचावर संघाचे पदाधिकारी राहतील की नाही, हा प्रश्न कायम होता. मात्र ही सभा संतांच्या आदेशानुसार ‘विहिंप’च्या नेतृत्वात होत आहे. मंचावर संत व ‘विहिंप’चे कार्याध्यक्ष हेच राहतील.संघाचे कुणीही पदाधिकारी मंचावर राहणार नाहीत.
आमदार, खासदारांची उपस्थिती
या सभेला विदर्भातील भाजप नेते, खासदार, आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना लोक आणण्यासाठी टार्गेट देण्यात आले आहे. या सभेच्या प्रचार-प्रसारासाठी सोशल मीडियाचा. मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला.
आठ ठिकाणी ‘पार्किंग’ची व्यवस्था
विदर्भातून एक लाख कार्यकर्ता या सभेसाठी अपेक्षित आहेत. या कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ‘पार्किंग’ची सोय आजूबाजूच्या परिसरातील आठ मैदानात करण्यात आली आहे. यात हनुमाननगरचे चौकोनी मैदान, प्रोफेसर कॉलनी मैदान, बास्केटबॉल मैदान, मोहता विज्ञान महाविद्यालयाचे मैदान, एसबीसीटी महाविद्यालय मैदान, चंदननगर मैदान, आयुर्वेदिक महाविद्यालय मैदान व जैन कलार भवन येथे ‘पार्किंग’ करता येणार आहे, असे सभा संयोजक सनतकुमार गुप्ता यांनी सांगितले.

Web Title: Hunkar for Ramamandir today: What will the Saint say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.