स्वच्छता अभियानात झाडू मारल्याच्या फोटोची शोधाशोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:42 AM2018-10-01T10:42:16+5:302018-10-01T10:45:12+5:30

स्वच्छता अभियानात सहभागी काही नगरसेवकांनी हातात झाडू धरला होता. या कार्यक्रमाच्या फोटोची शोधाशोध सुरू असून ते शपथपत्रासोबतच जोडता येईल का, याबाबत वकिलांशी सल्लामसलत सुरू आहे.

Hunt for a snapshot of a cleanliness campaign! | स्वच्छता अभियानात झाडू मारल्याच्या फोटोची शोधाशोध!

स्वच्छता अभियानात झाडू मारल्याच्या फोटोची शोधाशोध!

Next
ठळक मुद्देशपथपत्रासाठी दोनच दिवस शिल्लक नगरसेवकांना सचिवासोबतच गटनेत्यांनी पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १५१ नगरसेवकांना स्वच्छतेसाठी काय केले अन् काय करू इच्छिता याबाबतचे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शपथपत्र सादर करण्याला आता दोनच दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने नगरसेवकांची धावाधाव सुरु आहे. स्वच्छता अभियानात सहभागी काही नगरसेवकांनी हातात झाडू धरला होता. या कार्यक्रमाच्या फोटोची शोधाशोध सुरू असून ते शपथपत्रासोबतच जोडता येईल का, याबाबत वकिलांशी सल्लामसलत सुरू आहे.
न्यायालयाने ५ सप्टेंबरला नगरसेवकांना या आठवड्यात शपथपत्र सादर करण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार निगम सचिवांनी १४ सप्टेंबरला नगसेवक ांना पत्र पाठवून न्यायालयात ३ आॅक्टोबरपूर्वी शपथपत्र दाखल करण्याची सूचना केली. सोबतच महापालिकेतील गटनेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना पत्र पाठवून शपथपत्र दाखल करण्याबाबत सूचना केली आहे. त्यानुसार काहींनी वकिलांच्या सल्ल्यानुसार शपथपत्र तयार केले आहे.
शहरात मागील काही महिन्यांपासूक डेंग्यू, स्क्रब टायफसचा प्रकोप असल्याने नागरिकांत दशहत आहे. अस्वच्छतेमुळे डांसाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नगरसेवकांची अचानक फार्गिंग मशीनची मागणी वाढली आहे. परंतु आरोग्य विभागाकडे चारच फॉगिंग मशीन आहेत. अचानक फागिंग मशीनची मागणी वाढल्याने आरोग्य विभागापुढे धर्मसंकट उभे ठाकले आहे. मोठी फॉगिंग मशीन उपलब्ध नसेल तर किमान फागिंगची हॅन्ड मशीन उपलब्ध करा, अशी मागणी केली जात आहे. किमान यासंदर्भात झोन कार्यालयाकडे मागणी नोंदविली होती. याची माहिती शपथपत्रात देता येईल. हाही यामागील हेतू आहे.
प्रभागातील स्वच्छतेबाबतच्या समस्या सुटावी यासाठी नागरिकांनी नगरसेवकांना निवडून दिले. परंतु निवडून काही अपवाद वगळता बहुसंख्य नगरसेवकांनी सभागृहात आपल्या प्रभागातील स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केलेला नाही. निवडणुकीनंतर अनेकांचे अजूनही प्रभागातील नागरिकांना दर्शन झालेले नाही. असे नगरसेवक शपथपत्रात कोणती माहिती देतात याची नागरिकांना उत्सुकता आहे.

झोनकडे तक्रारी करूनही दखल नाही
प्रभाग ३० मध्ये कचऱ्याची व दूषित पाण्याची समस्या आहे. यासंदर्भात नेहरुनगर झोन कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु त्याची दखल घेतली जात नाही. वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांना शपथपत्रात स्वच्छतेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती द्यावयाची आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे आता तरी झोनचे अधिकारी याकडे लक्ष देतील. अशी माहिती नगरसेवक संजय महाकाळकर यांनी दिली.

Web Title: Hunt for a snapshot of a cleanliness campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.