नागपुरात सायबर गुन्हेगारांनी केली वन अधिकाऱ्याची ‘शिकार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 09:44 PM2018-12-14T21:44:16+5:302018-12-14T21:45:51+5:30

सायबर गुन्हेगारांनी डेबिट कार्ड रिन्युव्हल करण्याच्या नावावर एका वन अधिकाऱ्याला पावणेदोन लाख रुपयाचा चुना लावला.

'Hunting' of forest officials in Nagpur by cyber criminals |  नागपुरात सायबर गुन्हेगारांनी केली वन अधिकाऱ्याची ‘शिकार’

 नागपुरात सायबर गुन्हेगारांनी केली वन अधिकाऱ्याची ‘शिकार’

Next
ठळक मुद्देडेबिट कार्ड नुतनीकरणाच्या नावावर १.७५ लाख लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायबर गुन्हेगारांनी डेबिट कार्ड रिन्युव्हल करण्याच्या नावावर एका वन अधिकाऱ्याला पावणेदोन लाख रुपयाचा चुना लावला.
ही घटना ४ डिसेंबर रोजी घडली. डॉ. श्रवण शरद श्रीवास्तव हे भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत. ते ४ डिसेंबर रोजी आपल्या रविनगर येथील कार्यालयात हजर होते. त्यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. त्याने डॉ. श्रीवास्तव यांना त्यांचे डेबिट कार्ड नुतनीकरण करायचे असल्याचे सांगत त्यांच्याकडून डेबिट कार्डबाबत सर्व माहिती घेतली. त्यानंतर लगेच श्रीवास्तव यांच्या खात्यातून १ लाख रुपये लंपास केले. खात्यातून पैसे कटल्याचा एसएमएस सुद्धा त्यांना आला नाही. दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यातून पुन्हा ७५ हजार रुपये काढण्यात आले. त्यावेळी त्यांना एसएमएस आल्याने त्यांनी लगेच बँकेला विचारणा केली. तेव्हा त्यांच्या खात्यातून युपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून रक्कम काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांनी अंबाझरी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात दिल्लीतील सायबर टोळीचा हात असल्याचे सांगितले जाते.
न्यायाधीश, अधिकाऱ्यांसह अनेकांना फसविले
मागील काही दिवसात सायबर फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगारांची टोळी बँकेचे अधिकारी बनून लोकांना फसवित आहेत. काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यासह अनेकांना या टोळीने फसविले आहे. या प्रकरणात पोलिसांची एक चमू दिल्लीला पाठवण्यात आली आहे.

Web Title: 'Hunting' of forest officials in Nagpur by cyber criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.