नवऱ्यासह सासरच्या मंडळीकडून छळ  : विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 08:58 PM2018-08-24T20:58:54+5:302018-08-24T21:01:31+5:30

माहेरून फ्रीज आणि कॉम्प्युटर आणावा म्हणून विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह चौघांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Husband and in laws tortured: Married woman committed suicide | नवऱ्यासह सासरच्या मंडळीकडून छळ  : विवाहितेची आत्महत्या

नवऱ्यासह सासरच्या मंडळीकडून छळ  : विवाहितेची आत्महत्या

Next
ठळक मुद्देफ्रीज आणि कॉम्प्युटरसाठी तगादा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माहेरून फ्रीज आणि कॉम्प्युटर आणावा म्हणून विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह चौघांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गीता अनिल गुप्ता (२५) असे मृत महिलेचे नाव आहे.
लकडगंजमधील जुनी मंगळवारी परिसरात राकेश बिनेकर यांच्याकडे गीता तिच्या पतीसह भाड्याने राहत होती. तिचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिने माहेरून फ्रीज आणि कॉम्प्युटर आणावा म्हणून तिचा पती अनिल रामप्रसाद गुप्ता (३०), त्याची आई कलावती (६०), सुनीता दशरथ गुप्ता (३५) आणि सुनील रामप्रसाद गुप्ता (२६, रा. टिल्लोरा, जि. जोनपूर उत्तरप्रदेश) या सर्वांनी गीताकडे तगादा लावला होता. त्यासाठी ते तिचा छळ करीत होते. माहेरची परिस्थिती चांगली नाही, असे वारंवार सांगूनही आरोपींकडून होणारा त्रास कमी होत नव्हता. छळ असह्य झाल्याने गीताने २२ आॅगस्टला गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या मृत्यूला उपरोक्त आरोपीच कारणीभूत असल्याची तक्रार संजय लालचंद गुप्ता (३१, रा. आंबेवाडी, इंदिरानगर, ठाणे, मुंबई) यांनी लकडगंज पोलिसांकडे नोंदवली. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Husband and in laws tortured: Married woman committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.