पतीला आत्महत्येस प्रवृत्त केले

By Admin | Published: December 21, 2015 03:07 AM2015-12-21T03:07:47+5:302015-12-21T03:07:47+5:30

नवऱ्याचा मानसिक छळ करून त्याला त्याच्या पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची खळबळजनक घटना लकडगंजमध्ये उघडकीस आली.

The husband has been motivated by suicide | पतीला आत्महत्येस प्रवृत्त केले

पतीला आत्महत्येस प्रवृत्त केले

googlenewsNext

आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा : लकडगंजमधील घटना
नागपूर : नवऱ्याचा मानसिक छळ करून त्याला त्याच्या पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची खळबळजनक घटना लकडगंजमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुप्रिया ऊर्फ प्रिया अमोल पुप्पलवार (वय २७) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेली ही घटना पाच महिन्यांपूर्वी शांतिनगरमध्ये घडली होती. अमोल गंगाधर पुप्पलवार (वय ३१) याने १२ जुलैच्या सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद केली. चौकशीदरम्यान पोलिसांना अमोलने लिहिलेली सुसाईड नोट आढळली. पत्नीचा छळ असह्य झाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे अमोलने लिहिले होते. त्याने पत्नीच्या छळाचे अनेक किस्से त्याच्या नातेवाईकांनाही सांगितले होते. कायदा महिलांच्या बाजूने असल्यामुळे ती त्याला धमक्याही द्यायची. सततच्या मानसिक छळाला कंटाळून अखेर अमोलने गळफास लावून आत्महत्या केली.
त्याची आई सिंधुताई गंगाधर पुप्पलवार (वय ५५) यांनी लकडगंज पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून एपीआय राजूलवार यांनी आरोपी सुप्रियाविरुद्ध नवऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: The husband has been motivated by suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.