अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:50+5:302021-02-10T04:09:50+5:30
सतीश संभाजी किरनाके (४८, रा. तराेडा, जिल्हा वर्धा) असे मृताचे नाव आहे. ते कुटुंबीयांसह बुटीबाेरी येथील प्रसाद काॅलनीत किरायाने ...
सतीश संभाजी किरनाके (४८, रा. तराेडा, जिल्हा वर्धा) असे मृताचे नाव आहे. ते कुटुंबीयांसह बुटीबाेरी येथील प्रसाद काॅलनीत किरायाने राहायचे. त्यांना अंत्ययात्रेसाठी झरगड, जिल्हा यवतमाळ येथे जायचे असल्याने ते पत्नीला घेऊन ॲक्टिव्हाने (एमएच-४९/वाय-८०२६) हिंगणघाटमार्गे झरगडच्या दिशेने निघाले. दरम्यान, जसापूर शिवारात त्यांचा ॲक्टिव्हावरील ताबा सुटला आणि ॲक्टिव्हा राेडखाली उतरल्याने स्लीप झाली. त्यामुळे दाेघेही काेसळल्याने गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले व जखमींना समूद्रपूर (जिल्हा वर्धा) येथील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी सतशी यांना तपासणीअंति मृत घाेषित केले, तर त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू केले. जखमी पत्नीचे नाव कळू शकले नाही. याप्रकरणी बेला पाेलिसांनी भादंवि२७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक राहुल ठेंगणे करीत आहेत.