भरधाव वाहनाची दुचाकीला धडक : पती ठार, पत्नी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 10:25 PM2020-10-20T22:25:10+5:302020-10-20T22:38:07+5:30
Accident Husband killed, wife injured भरधाव मालवाहू वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला धडक दिली. त्यात दुचाकीचालक पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतल माेहपा-सुसुंद्री मार्गावर मंगळवारी (दि. २०) सायंकाळी घडली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (माेहपा) : भरधाव मालवाहू वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला धडक दिली. त्यात दुचाकीचालक पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतल माेहपा-सुसुंद्री मार्गावर मंगळवारी (दि. २०) सायंकाळी घडली.
मदन तेजराम पांडे (४०) असे मृत पतीचे तर त्रिवेणी मदन पांडे (३५) असे जखमी पत्नीचे नाव आहे. ते दाेघेही माेहपा, ता. कळमेश्वर येथील रहिवासी असून, नागपूर-काटाेल मार्गावरील उबगी शिवारात असलेल्या कंपनीमध्ये काम करायचे. ते मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे कामावरून एमएच-३१\एडब्ल्यू-१४२ क्रमांकाच्या माेटरसायकलने माेहप्याला घरी परत येत हाेते. दरम्यान, माेहपा-सुसुंद्री मार्गावरील सुसुंद्री शिवारात विरुद्ध दिशेने वेगात येणऱ्या एमएच-४०\एके-४२७६ क्रमांकाच्या छाेट्या मालवाहू वाहनाने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दाेघेही गंभीर जखमी झाले तर, माेटरसायकल राेडच्या बाजूला फेकल्या गेली. मदन यांचा काही वेळातच घटनास्थळी मृत्यू झाला.
अपघात हाेताच वाहनचालकाने वाहन साेडून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी पाेलिसांना सूचना देत जखमी त्रिवेणी यांना माेहपा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. शिवाय, पाेलिसांनी मदन यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मदन यांच्या अपघाती मृत्यूमुळे पांडे कुटुंबीयांवर संकट काेसळले आले. त्यांना म्हातारे आई, वडील व दाेन मुली आहेत. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.