प्रियकराच्या साथीने पतीची हत्या
By Admin | Published: September 23, 2015 06:31 AM2015-09-23T06:31:23+5:302015-09-23T06:31:23+5:30
प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली. या घटनेला अपघाताचे रूप देऊन ही महिला
नागपूर : प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली. या घटनेला अपघाताचे रूप देऊन ही महिला आपल्या प्रियकरासोबत मौजमजा करू लागली. मात्र, शवविच्छेदन अहवालामुळे तिचे बिंग फुटले आणि पोलिसांनी तिला व तिच्या प्रियकरासह तिघांना अटक केली. अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्याची तीन दिवसात दुसरी घटना उघडकीस आल्यामुळे उपराजधानीत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
मृताचे नाव संजय रामराव मोंढे वय (वय ४५) आहे. तो माउली नगर, नरसाळा रोड, येथे पत्नी आणि दोन मुलांसह राहात होता. मूळचा नरखेड येथील रहिवासी असलेला संजय काही वर्षांपूर्वी नागपुरात राहायला आला. तो टेलरिंग करायचा. मात्र, त्या भागात त्याचे टेलरिंग चालत नव्हते. त्यामुळे त्याने घरीच किराणा दुकान लावले.
अखेर डाव साधला
सप्टेंबरच्या मध्यरात्री आरोपींनी डाव साधला. दारूच्या नशेतील संजयच्या गळ्यात दोरीचा फास टाकून करण आणि माधुरीने त्याची हत्या केली. दोरीचा फास बनविण्यासाठी संजयने त्याचा पुतण्या विपीनसिंग विक्रमसिंग कुशवाह याची मदत घेतली होती. त्यानंतर माधुरी आणि करणने संजयचा मृतदेह हातगाडीवर लादून तो रेणुका माता नगरात फेकून दिला. त्याच्या शेजारी त्याची मोटरसायकलही टाकली. अपघाताने सदर व्यक्तीचा मृत्यू झाला, असे वाटावे यासाठी आरोपींनी हे प्रयत्न केले.