पत्नी सोडून गेल्याने पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:34 AM2019-05-08T00:34:17+5:302019-05-08T00:43:44+5:30

पत्नी घरी परत न आल्याने दु:खी असलेल्या पतीने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना जरीपटका परिसरात सोमवारी रात्री घडली.

The husband's suicide attempt by leaving his wife | पत्नी सोडून गेल्याने पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पत्नी सोडून गेल्याने पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देनागपूरच्या जरीपटका भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नी घरी परत न आल्याने दु:खी असलेल्या पतीने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना जरीपटका परिसरात सोमवारी रात्री घडली.
राजेंद्र रामकिशन ढोले (३५) रा. कपिलनगर असे जखमी पतीचे नाव आहे. राजेंद्रची पत्नी काही दिवसांपासून आपल्या घरी परत येत नव्हती. त्यामुळे तो दु:खी होता. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास राजेंद्रने अचानक कुठल्यातरी वस्तूने आपल्या हाताची नस कापून स्वत:ला जखमी केले. रेखाबाई ढोले यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दोघांनी घेतला गळफास
गिट्टीखदान व यशोधरानगर परिसरात सोमवारी दोघांनी आपापल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पहिली घटना गिट्टीखदान परिसरातील हजारीपहाड येथे घडली. मुकेश आटा चक्कीजवळ राहणाऱ्या समुवेद सुनील बनेवार (३०) याने दुपारी १ वाजता आपल्या घरी गळफास घेतला. उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचप्रकारे यशोधरानगर येथील इंदिरा माता नगर येथील गणेश ताराचंद सहारे (४२) याने सायंकाळी ५ वाजता खोलीत गळफास घेतला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
स्वत:ला जाळून घेतले
पाचपावलीतील बंगाली पंजा परिसरात २७ वर्षीय युवकाने स्वत:च्या अंगावर केरोसीन टाकून जाळून घेतले. मो. शोएब मो. असलम असे मृताचे नाव आहे. १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता शोएबने आपल्या घरीच स्वत:च्या अंगावर केरोसीन टाकून जाळून घेतले. त्याला उपचरासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ६ म रोजी त्याचा मृत्यू झाला. पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

महिलेसह दोघांनी घेतले विष 
 नंदनवन परिसरात एका नवविवाहितेसह दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. पहिली घटना नंदनवन परिसरात रविवारी घडली. प्रतिक्षा राहुल वासनिक (२२) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री १० वाजता प्रतिक्षाने विषप्राशन केले. तिची प्रकृती बिघडल्याने तिला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी ६ मे रोजी रात्री ११ वाजता तिचा मृत्यू झाला. दुसरी घटना नंदनवन येथील शक्तिमाता नगरात घडली. ४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घडली. पुरुषोत्तम विठोबाजी मोहाडीर (६५) असे मृताचे नाव आहे. विषयुक्त औषध प्राशन केल्याचे त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

Web Title: The husband's suicide attempt by leaving his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.