हैदराबादसाठी आता एसटीची शिवशाही एसी स्लिपर बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:27 AM2018-07-18T01:27:34+5:302018-07-18T01:28:33+5:30

खासगी प्रवासी वाहतुकीला तोड देऊन प्रवाशांना आरामदायी सुखकर सेवा पुरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागपूरवरून हैदराबादसाठी शिवशाही वातानुकूलित स्लिपर बससेवेचा शुभारंभ केला आहे.

For the Hyderabad, now the ST's Shivshahi AC Slipper bus service | हैदराबादसाठी आता एसटीची शिवशाही एसी स्लिपर बससेवा

हैदराबादसाठी आता एसटीची शिवशाही एसी स्लिपर बससेवा

Next
ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा : पंढरपूर, आदिलाबाद, निर्मल, निजामाबाद मार्गे धावणार

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : खासगी प्रवासी वाहतुकीला तोड देऊन प्रवाशांना आरामदायी सुखकर सेवा पुरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागपूरवरून हैदराबादसाठी शिवशाही वातानुकूलित स्लिपर बससेवेचा शुभारंभ केला आहे.
हैदराबादला सोडण्यात येणारी एसटीची शिवशाही वातानुकूलित स्लिपर बस गणेशपेठ बसस्थानकावरून दुपारी ३ वाजता सुटून हैदराबादला पहाटे २.२५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात हैदराबाद येथून ही बस सायंकाळी ६.३० वाजता सुटून नागपूरला सकाळी ५.५५ वाजता पोहोचेल. ही बस पांढरकवडा, आदिलाबाद, निर्मल, निजामाबाद मार्गे धावणार आहे. प्रवाशांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवशाही, शिवनेरी, वातानुकूलित व इतर प्रवासी बसेससोबत शिवशाही वातानुकूलित स्लिपर बसचे आरक्षण महामंडळाच्या संकेतस्थळावरून आॅनलाईन करता येईल. सदर शिवशाही बस वातानुकूलित स्लिपर असून आकर्षक डिजिटल बोर्ड, मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही कॅमेरा, अनाऊन्समेंट सिस्टीमचा यात समावेश आहे. शुभारंभ प्रसंगी गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक विजय कुडे यांनी या बसमधील प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रवाशांनी या शिवशाही वातानुकूलित स्लिपर बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर विभागाच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे.
...........

Web Title: For the Hyderabad, now the ST's Shivshahi AC Slipper bus service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.