हायड्रोसीलच्या रुग्णांची हेळसांड : अकार्यक्षमतेबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 11:32 PM2019-09-30T23:32:57+5:302019-09-30T23:36:13+5:30

आरोग्य सेवा संचालकांंनी नागपूर जिल्ह्याला दरमहा हायड्रोसीलची ३१५ रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट दिले होते, मात्र जुलै व ऑगस्ट महिन्यात केवळ ११३ अंडवृद्धी शस्त्रक्रिया झाल्या. यावर संचालकांनी नाराजी व्यक्त करीत संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अकार्यक्षमतेबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Hydrocele Patient negligence: Directives for Disciplinary Action on Inaction | हायड्रोसीलच्या रुग्णांची हेळसांड : अकार्यक्षमतेबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश

हायड्रोसीलच्या रुग्णांची हेळसांड : अकार्यक्षमतेबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश

Next
ठळक मुद्देदरमहा ३१५ शस्त्रक्रियेचे लक्ष्य असताना ११३ शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्य सेवा संचालकांंनी नागपूर जिल्ह्याला दरमहा हायड्रोसीलची ३१५ रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट दिले होते, मात्र जुलै व ऑगस्ट महिन्यात केवळ ११३ अंडवृद्धी शस्त्रक्रिया झाल्या. यावर संचालकांनी नाराजी व्यक्त करीत संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अकार्यक्षमतेबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
वाढत्या वयासोबतच पुरुषांना अनेक आरोग्य समस्या होतात. ‘हायड्रोसील’ म्हणजे अंडवृद्धी नावाचा आजार हा यामधीलच एक आहे. हा आजार पुरुषांच्या ‘स्क्रोटम’(अंडकोष पिशवी)संबंधित असतो. वयाची ४० वर्षे पूर्ण केल्यानंतर हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. डॉक्टरांच्या मते, ‘टेस्टिकल’च्या बाहेर दोन स्तर असतात. यामध्ये ‘फ्लुईड’ भरलेले असते. एखाद्या कारणामुळे हे ‘फ्लुईड टेस्टिकल’च्या बाहेर जमा झाले तर हायड्रोसीलची समस्या होऊ शकते. यामध्ये ‘स्क्रोटम’(अंडकोष पिशवी) मोठे होते. यामध्ये तीव्र वेदना होतात. ग्रामीण भागात या आजाराच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. जिल्हा आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार नागपुरात २१९१ अंडवृद्धी रुग्णांची नोंद आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्यातील सर्व अंडवृद्धी रुग्णांचे शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्याला १८८५ अंडवृद्धी शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट व त्याकरिता लागणारे अनुदान १९.४९ लाख उपलब्ध करून देण्यात आले होते. जून महिन्यापासून दरमहा ३१५ या शस्त्रक्रिया होणे आवश्यक होते. परंतु जुलै व आॅगस्ट महिन्यात केवळ ११३ शस्त्रक्रियाच झाल्या. आरोग्य सेवा संचालकांनी २० सप्टेंबर रोजी झालेल्या ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अकार्यक्षमतेबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले; सोबतच अंडवृद्धी रुग्ण तपासणी अभियान कार्यक्रम पत्रकानुसार राबविण्याचा सूचनाही दिल्या.
अद्याप कुणावर कारवाई नाही
संचालकांच्या निर्देशानुसार अद्याप कमी शस्त्रक्रिया करणाºया जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अकार्यक्षमतेबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, अंडवृद्धी रुग्ण तपासणी अभियान कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, दिलेल्या सूचनानुसार कार्यक्रम चालविला जात आहे.
डॉ. दीपक सेलोकर
जिल्हा आरोग्य अधिकारी, नागपूर

Web Title: Hydrocele Patient negligence: Directives for Disciplinary Action on Inaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.