हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी बंद

By Admin | Published: October 7, 2016 02:50 AM2016-10-07T02:50:26+5:302016-10-07T02:52:16+5:30

गुंतागुंतीच्या, बऱ्या न होणाऱ्या जखमांनी त्रस्त रुग्णांना विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांना दिलासा ठरू शकेल अशी ‘हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी’

Hyperbaric oxygen therapy closed | हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी बंद

हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी बंद

googlenewsNext

मेडिकलला मिळेना तंत्रज्ञ : उपचाराअभावी गंभीर रुग्ण अडचणीत
गुंतागुंतीच्या, बऱ्या न होणाऱ्या जखमांनी त्रस्त रुग्णांना विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांना दिलासा ठरू शकेल अशी ‘हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी’ सहा महिन्यांपासून बंद आहे. मध्यभारतात केवळ मेडिकलमध्ये हे उपकरण आहे. १ कोटी २० लाखांचे हे उपकरण चालविण्यासाठी मेडिकलला तंत्रज्ञ मिळत नसल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत.

सुमेध वाघमारे ल्ल नागपूर
भारतामध्ये जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण आढळतात. मृत्यूच्या कारणामध्ये मधुमेह हे सर्वाधिक कारणापैकी एक आहे. मधुमेह ही व्याधी केवळ रक्तातील वाढलेली शर्करा या स्वरु पात नसून ती शरीरातील महत्वाच्या अवयवांना हळूहळू निकामी करतो. यात गंभीर जखम झाल्यास व त्याकडे दुर्लक्ष केल्यास वेळप्रसंगी संबंधित अवयव कापावा लागतो. अशा जखमांसह, जळीतरुग्ण, गँगरीन व न्यूरोसर्जरी नंतर त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी ‘हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी’ वरदान ठरते. याला लक्षात घेऊनच २०१० मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) १ कोटी २० लाख रुपये किमतीचे हे यंत्र खरदी केले. मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया गृह ‘ड’मधील एका खोलीत हे उपकरण बसविण्यात आले. गेल्या सहा वर्षांपासून रोज पाच ते सात रुग्णांवर उपचार केले जात होते. परंतु सहा महिन्यापूर्वी येथील तंत्रज्ञ निवृत्त होताच हे यंत्र बंद पडले.
रुग्णांना खासगी केंद्राकडे पाठविले जात आहे. विशेष म्हणजे, खासगीमध्ये एका ‘थेरपी’ची किमत दोन हजाराच्यावर आहे. मेडिकलमध्ये ही उपचारपद्धती बीपीएल व ज्येष्ठ नागरिकांसाठी नि:शुल्क होती. मात्र आता यंत्रच बंद पडल्याने गंभीर रुग्ण अडचणीत आले आहेत. यातील अनेकांवर अवयव कापण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे.

तंत्रज्ञाअभावी अनेक यंत्र धूळ खात
विदर्भच नव्हे तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंधप्रदेश येथून रुग्ण नागपूरच्या मेडिकलमध्ये येतात. हजारो गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावे म्हणून शासनाने येथे कोट्यवधीची अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. मात्र ते हाताळणारे तंत्रज्ञच नसल्याने धूळखात पडले आहेत. यात कोट्यवधीच्या ‘हायपरबेरिक आॅक्सिजन’ उपकरणासोबतच ‘इको कार्डिओग्राफी, ईएमजी, एनसीव्ही, सीपीटीएस’ यासारखे अनेक यंत्र धूळ खात पडले आहेत. मेंदूमधील विद्युत लहरींच्या हालचाली समजण्यासाठी ईईजी यंत्र चार वर्षांपासून सायकॅट्रिक विभागात बंद स्थितीत आहे.

Web Title: Hyperbaric oxygen therapy closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.