ह्युंडई मोटर इंडिया फाउंडेशनची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:07 AM2021-05-29T04:07:40+5:302021-05-29T04:07:40+5:30
- वाणिज्य पट्टा.... १० बाय २ ..फोटो .. नागपूर : ह्युंडई मोटर इंडिया लिमिटेडच्या ह्युंडई मोटर इंडिया फाउंडेशनने ‘स्पर्श ...
- वाणिज्य पट्टा.... १० बाय २ ..फोटो ..
नागपूर : ह्युंडई मोटर इंडिया लिमिटेडच्या ह्युंडई मोटर इंडिया फाउंडेशनने ‘स्पर्श संजीवनी’ नावाने सामाजिक उपक्रमावर फिल्म प्रसारित केली असून, ह्युंडईच्या मोबाईल मेडिकल व्हॅनद्वारे भारताच्या ग्रामीण भागात जाऊन तेथील लोकांना आरोग्य सेवा प्रदान केल्याचे क्षण फिल्ममध्ये आहेत. फिल्मसंदर्भात ह्युंडई मोटर इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. किम म्हणाले, आम्ही प्रत्येक उपक्रमातून समाजासाठी अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यात विश्वास ठेवतो. आम्ही मानवतेसाठी प्रगती करण्याच्या आपल्या दृष्टिकोनातून प्रेरणा घेत आहोत. संपूर्ण भारतभर लोकांमध्ये हसू, कल्याण आणि समृद्धी आणण्याच्या प्रयत्नात आहोत. ‘स्पर्श संजीवनी’ फिल्मने दर्जेदार वैद्यकीय सहाय्य आणि आरोग्य सेवांमध्ये अधिकाधिक प्रवेश करण्याच्या प्रवासाला योग्य प्रकारे चित्रित केले आहे. स्पर्श संजीवनी मोबाइल चिकित्सेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आणि हे प्रयत्न पुढेही सुरू राहणार आहेत. संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड ब्लॉकमध्ये करण्यात आले आहे. सर्व पात्र गावातील स्थानिक रहिवासी आहेत. चित्रपटात संजीवनी या नावाने प्रख्यात एक जीवनरक्षक भारतीय औषध वनस्पती मुख्य पात्र आणि कथा सांगणाऱ्यांची भूमिका साकारत आहे. आपला जीव वाचविण्याच्या वारशाबद्दल बोलताना हा चित्रपट मोबाइल मेडिकल युनिट (स्पर्श संजीवनी) म्हणून प्रवास करीत इतिहासाच्या अंतरावर असलेल्या प्रदेशांपर्यंत पोहोचतो आणि मोठ्या प्रमाणात लोक आणि समुदायांची सेवा करतो. मोबाइल चिकित्सा युनिट आणि भागीदार स्वयंसेवी संस्था वोक्हार्टचे दररोज दोन गावांतील २५ हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. (वा.प्र.)