मी परिवार व समाजाचा दुष्मन आहे, मी घरी नाही राहणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 01:13 PM2020-03-24T13:13:03+5:302020-03-24T13:13:38+5:30
संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू असताना, रस्त्यावर विनाकारण हिंडणाऱ्यांच्या हाती एक फलक देऊन त्यांचा फोटो काढला जातोय व तो सोशल मिडियावरून सर्वत्र पाठवला जातोय. या फलकावर, मी परिवार व समाजाचा दुष्मन आहे, मी घरी नाही राहणार असे लिहिलेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू असताना, रस्त्यावर विनाकारण हिंडणाऱ्यांच्या हाती एक फलक देऊन त्यांचा फोटो काढला जातोय व तो सोशल मिडियावरून सर्वत्र पाठवला जातोय. या फलकावर, मी परिवार व समाजाचा दुष्मन आहे, मी घरी नाही राहणार असे लिहिलेले आहे.
वारंवार सांगूनही काही नागरिकांना या संचारबंदीचे महत्त्व वाटत नाही व ते रस्त्यावर हिंडत राहतात. त्यांच्यामुळे अन्य नागरिकांनाही आपणही फिरावे असे वाटते व ते बाहेर पडत ात. या प्रकारामुळे कोरोनासाठी घेत असलेल्या खबरदारीचे तीन तेरा वाजत आहेत. यावर तोडगा म्हणून नागपूर पोलिसांनी कागदावर काही मजकूर छापून त्याचे फलक बनवले. नियम तोडणाºयाच्या हाती हा फलक दिला जातो व त्याचा फोटो काढला जातो. या कृतीमुळे तरी त्या संबंधित नागरिकाला आपली चूक कळेल व तो घरात स्वत:ला बंदिस्त करून ठेवेल अशी अपेक्षा आहे.