‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 09:46 PM2018-08-21T21:46:01+5:302018-08-21T21:47:21+5:30
सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे राज्य शासनाने प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्यापपर्यंत तो गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यापर्यंत पोहोचलेलाच नाही. खुद्द अहिर यांनीच ही स्पष्टोक्ती केली आहे. ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचा दावा राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी केला होता हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे राज्य शासनाने प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्यापपर्यंत तो गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यापर्यंत पोहोचलेलाच नाही. खुद्द अहिर यांनीच ही स्पष्टोक्ती केली आहे. ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचा दावा राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी केला होता हे विशेष.
बेकायदेशीरपणे व नियमबाह्य काम करणाऱ्या या संस्था किंवा व्यक्तींवर कारवाई करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. राज्य शासनांतर्फे पाठविण्यात आलेल्या अशा प्रस्तावांना कुठल्याही प्रकारे थांबविण्यात येत नाही. आमची तशी भूमिकाच नाही. अगोदर असे प्रस्ताव हे गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे जातात. त्यानंतर गुप्तचर खात्याचा अहवाल मागवून त्यानंतर कारवाई करण्यात येते. प्रस्तावाची संपूर्ण पडताळणी झाल्यानंतरच असा प्रस्ताव अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांकडे येतो, असे अहिर यांनी सांगितले.
अगोदरच्या शासनाच्या कार्यकाळात सनातनवर बंदीचा प्रस्ताव का पुढे गेला नाही याची माहिती आम्ही घेतली नाही असे देखील अहिर म्हणाले.