मी निवृत्त झालो नाही

By admin | Published: October 28, 2016 02:46 AM2016-10-28T02:46:44+5:302016-10-28T02:46:44+5:30

अनेकजण मला निवृत्त समजत असले तरी मी निवृत्त झालेलो नाही, असे भावनिक वक्तव्य वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे

I have not retired | मी निवृत्त झालो नाही

मी निवृत्त झालो नाही

Next

अटलबहादूर सिंग : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे सत्कार
नागपूर : अनेकजण मला निवृत्त समजत असले तरी मी निवृत्त झालेलो नाही, असे भावनिक वक्तव्य वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (डब्ल्यूआयएफए) माजी उपाध्यक्ष आणि जिल्हा फुटबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष सरदार अटलबहादूर सिंग यांनी केले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे गुरुवारी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार दत्ता मेघे, माजी मंत्री नितीन राऊत, आमदार समीर मेघे, माजी महापौर कुंदाताई विजयकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अटलबहादूर यांना यावेळी शाल-श्रीफळ आणि आकर्षक सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
आपल्या छोटेखानी भाषणात गडकरी यांनी अटलबहादूर सिंग यांना चांगले आरोग्य लाभण्याची प्रार्थना करताना क्रीडा क्षेत्रात विशेषत: फुटबॉलमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली.
नागपूरचे दोनदा महापौरपद भूषविणारे आणि प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराचे (२०१४) मानकरी सरदार अटलबहादूर सिंग यांनी सत्कार करण्यात आल्यानंतर डब्ल्यूआयएफ व जिल्हा फुटबॉल संघटनेच्या सर्व सदस्यांनी आभार व्यक्त केले. अटलबहादूर मंदस्मित करीत म्हणाले,‘लोक मला निवृत्त समजत असले तरी मी निवृत्त झालेलो नाही. मी नेहमी मित्र जोडण्यावर भर दिला. कदाचित मला कुणी शत्रूच नाही.’ सत्काराबाबत बोलताना ते म्हणाले,‘मी ज्याप्रकारे क्रीडाप्रेमी व खेळाडूंचा सत्कार केला तशाच प्रकारे माझाही कुणी सत्कार करेल, याचा मी कधी विचारही केला नाही.’ कार्यक्रमाला डब्ल्यूआयएफएचे सचिव साउटर वाज, हेन्री मेनेजेस, जिल्हा फुटबॉल संघटनचे अध्यक्ष हरेश व्होरा, सचिव युजिन नॉर्बट आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: I have not retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.