वाटलं टायर फुटला, पण ग्रेनाईड बॉम्ब होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:45 AM2018-05-24T01:45:32+5:302018-05-24T01:45:43+5:30
जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांच्यासह तीन आमदार ग्रेनाईट हल्ल्यात थोडक्यात बचावले. पंचायत राज कमिटीचा ताफा जोरात पुढे निघाला, तेव्हा मागे गाडीचा टायर फुटल्यासारखा जोरात आवाज आला. पुढे गाड्या थांबल्यावर कळले की ग्रेनाईड बॉम्ब फेकण्यात आला होता, असा थरारक अनुभव आ. सुधीर पारवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांच्यासह तीन आमदार ग्रेनाईड हल्ल्यात थोडक्यात बचावले. पंचायत राज कमिटीचा ताफा जोरात पुढे निघाला, तेव्हा मागे गाडीचा टायर फुटल्यासारखा जोरात आवाज आला. पुढे गाड्या थांबल्यावर कळले की ग्रेनाईट बॉम्ब फेकण्यात आला होता, असा थरारक अनुभव आ. सुधीर पारवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितला.
पारवे म्हणाले, विक्रम काळे, तुकाराम काथे, किशोर पाटील, दीपक चव्हाण या चार आमदारांसह आपण पहेलगामवरून श्रीनगरला निघालो; सोबत समितीचे सचिव विलास आठवले व जम्मू सरकारचेही अधिकारी होते. अनंतनाग जिल्ह्यातील बीजबिहारा या गावात गाड्या पोहोचल्या. दोन्ही बाजूला दुकाने होती. बाजारातून आमचा ताफा वेगाने पुढे जात होता. एवढ्यात मागे जोरात गाडीचा टायर फुटल्यासारखा आवाज झाला. पुढे गाड्या थांबल्यावर माहीत पडले की मागे ग्रेनाईटचा स्फोट झाला व काही लोक जखमी झाले. यामुळे काही गाड्यांचे टायर फुटले. एका शासकीय वाहनाचे नुकसान झाले. यात गावातील काही लोक जखमी झाले. सुदैवाने आमच्यापैकी कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर आम्ही श्रीनगर गाठले व तेथील प्रशासनाला याची माहिती दिली. २६ रोजी समिती महाराष्ट्रात परत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.