काश मास्क ठीक से पहना होता ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:07 AM2021-05-29T04:07:11+5:302021-05-29T04:07:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनापासून वाचायचे असेल तर मास्क घालणे अत्यावश्यक आहे. एक छोटीशी मुखपट्टी (मास्क) कोणाचा तरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनापासून वाचायचे असेल तर मास्क घालणे अत्यावश्यक आहे. एक छोटीशी मुखपट्टी (मास्क) कोणाचा तरी जगण्याचा आधार, कोणाचे तरी छत्र हिरपण्यापासून वाचवू शकते. परंतु, नागरिकांमध्ये असलेल्या बेफिकिरीमुळे अनेकांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागले आहेत. कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर मास्कची आवश्यकता सर्वसामान्य नागरिकांना कळावे, यासाठी जनजागृती मोहीम साकारण्यात आली आहे. या विशेष मोहिमेचा शुभारंभ विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते झाला.
कॅलामेटी रिस्पॉन्स ग्रुप नागपूर व माहिती व जनसंपर्क विभाग हे संयुक्तपणे कलात्मक कोरोनाविषयक जाहिरात मोहीम राबविणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात एका छोटेखानी कार्यक्रमात कोरोनाविषयक जनजागृती मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी विवेक रानडे, अमित पंचेमेतीया, माहिती संचालक हेमराज बागुल, माध्यम समन्वयक अनिल गडेकर, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या उपसंचालक गौरी पंडित-मराठे आदी उपस्थित होते.