दोन गुणांनी ‘आयएएस’ निसटले

By Admin | Published: June 1, 2017 02:26 AM2017-06-01T02:26:43+5:302017-06-01T02:26:43+5:30

नापास विद्यार्थ्याची आत्महत्या हे शीर्षक वाचूनच धक्का बसतो अजूनही. संयमाची परीक्षा पाहणारे प्रसंग येतच असतात आयुष्यात.

IAS 'escapes with two points | दोन गुणांनी ‘आयएएस’ निसटले

दोन गुणांनी ‘आयएएस’ निसटले

googlenewsNext

नापास विद्यार्थ्याची आत्महत्या हे शीर्षक वाचूनच धक्का बसतो अजूनही. संयमाची परीक्षा पाहणारे प्रसंग येतच असतात आयुष्यात. माझ्याही आयुष्यात ते आले. मी प्रचंड कष्ट उपसूनही केवळ दोन गुणांनी ‘आयएएस’ माझ्या हातून निसटले. तब्बल चार वर्षे परिश्रम केल्यावर मी पहिल्यांदा जेव्हा यूपीएससीच्या परीक्षेला बसले. तेव्हा मुख्य परीक्षेतील ३०० गुणांपेकी तब्बल ८० गुणांचा पेपर मी सोडवूच शकले नाही. दहावी बारावीमध्ये मेरिटमध्ये आलेली मी ८० गुण केवळ वेळ पुरला नाही म्हणून सोडवू शकले नव्हते. त्यामुळे मला माझाच प्रचंड राग आला. मी अगदीच निराश झाले होते. परंतु मी जिद्द सोडली नाही. लिहिण्याचा प्रचंड सराव केला. टाईम मॅनेजमेंटवर परिश्रम घेतले आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये यूपीएससी उत्तीर्ण केली. केवळ उत्तीर्णच केली नाही तर मी तेव्हा महाराष्ट्रातून पहिली आले. ट्रेस आणि डिप्रेशन ही जीवनातील सामान्य बाब आहे. ते जीवनात कधीना कधी येतेच. परंतु त्याला चिटकून राहू नये. आज मोबाईलच्या काळात सोशली खूप अटॅचमेंट वाढल्या परंतु खरा संवाद हरवला आहे. मोबाईलचा वापर केवळ गरजेपुरता करा. कुटुंब आणि मित्रांशी खरा संवाद साधा. यामुळे जीवनातील टे्रस आणि डिप्रेशन हे दूर होतात, हा माझा अनुभव आहे.
डॉ. माधवी खोडे ,
अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग
 

Web Title: IAS 'escapes with two points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.