आयबीचे अधिकारी अशोक भिंगारे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:39 AM2018-05-06T00:39:28+5:302018-05-06T00:39:39+5:30
केंद्रीय गुप्तवार्ता विभाग (इंटेलिजन्स ब्यूरो) नागपूर मध्ये कार्यरत असलेले अशोक भिंगारे (वय अंदाजे ५७) यांचे शनिवारी सायंकाळी एका खासगी इस्पितळात निधन झाले. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या सीपीडब्ल्यूडी कॉलनी, सेमिनरी हिल्समधील निवासस्थानाहून निघणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय गुप्तवार्ता विभाग (इंटेलिजन्स ब्यूरो) नागपूर मध्ये कार्यरत असलेले अशोक भिंगारे (वय अंदाजे ५७) यांचे शनिवारी सायंकाळी एका खासगी इस्पितळात निधन झाले. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या सीपीडब्ल्यूडी कॉलनी, सेमिनरी हिल्समधील निवासस्थानाहून निघणार आहे.
अत्यंत हुशार अधिकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या भिंगारे यांचा बराचसा सेवाकाळ नागपुरात गेला आहे. त्यांचे विदर्भातील नक्षलग्रस्त भागात जोरदार नेटवर्क होते. या भागातील नक्षलसंबंधी घडामोडींवर त्यांचे विशेष लक्ष असायचे. त्यांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण सूचनावजा माहितीमुळे विदर्भातील गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील नक्षल कारवायांवर अंकुश ठेवणे सुरक्षा यंत्रणांना सोपे झाले. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल सरकारने त्यांना विविध पदके देऊन अनेकदा गौरव केला. काही महिन्यांपूर्वी भिंगारे यांना कर्करोग झाला होता. त्याच्याशी लढत असतानाच १ मे रोजी त्यांना ब्रेनस्ट्रोकमुळे एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथून त्यांची प्रकृती खालावतच गेली. शनिवारी सायंकाळी ६.२४ वाजता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.