आयकॅडचा विद्यार्थी श्रीनभ आयवायएमसीमध्ये अव्वल ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:36 AM2020-12-17T04:36:37+5:302020-12-17T04:36:37+5:30
नागपूर : आयकॅडचा विद्यार्थी श्रीनभ अग्रवालने जगभरातील विद्यार्थ्यांसाठी होणारी सर्वात मोठी गणित स्पर्धा ‘द इंटरनॅशनल युथ मॅथ चॅलेंज’(आयवायएमसी)मध्ये प्रथम ...
नागपूर : आयकॅडचा विद्यार्थी श्रीनभ अग्रवालने जगभरातील विद्यार्थ्यांसाठी होणारी सर्वात मोठी गणित स्पर्धा ‘द इंटरनॅशनल युथ मॅथ चॅलेंज’(आयवायएमसी)मध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त करून देशाचा नावलौकिक वाढविला आहे. आयवायएमसीमध्ये १८ वर्ष आणि त्यावरील विद्यार्थी असे दोन गट असतात. यात चांगले प्रदर्शन करणाऱ्या जगभरातील विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल अवॉर्ड सर्टिफिकेट देण्यात येते. श्रीनभने ९८ देशातून सहभागी विद्यार्थ्यांमधून हे यश भारताच्या नावाने नोंदविले आहे. प्रमाणपत्राशिवाय श्रीनभने भारताचा बेस्ट परफॉर्मिंग स्टुडंट या नात्याने रोख पुरस्कार, गोल्ड ऑनर आणि नॅशनल अवॉर्ड सर्टिफिकेटही पटकावले आहे. आयवायएमसीमध्ये तीन टप्पे असतात. हे तीन टप्पे तीन महिन्यात पूर्ण होतात. प्रत्येक टप्प्यात श्रीनभ अग्रवालने जगभरातील ९८ देशातील विद्यार्थ्यांसोबत चांगली स्पर्धाच केली नाही, तर सर्वाधिक गुण घेऊन या स्पर्धेच्या अखेरीस विजेता ठरला. वर्ल्ड रँक १ मिळवून श्रीनभने भारलाला सर्वाधिक उंचीवर नेले आहे.
......