बर्फ नव्हे, हा तर विषाचाच गोळा.. खाण्याचा मोह टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 01:01 PM2022-03-14T13:01:35+5:302022-03-14T13:14:42+5:30

उन्हाळा आला की थंडपेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, शीतपेये अथवा बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत शंका कुणालाच येत नाही.

ice golas are tempting butharmful for health | बर्फ नव्हे, हा तर विषाचाच गोळा.. खाण्याचा मोह टाळा

बर्फ नव्हे, हा तर विषाचाच गोळा.. खाण्याचा मोह टाळा

googlenewsNext
ठळक मुद्देअमोनिया वायू. दूषित पाणी व कायकाय खाताहेत नागपूरकर

नागपूर : कमी भांडवलात बक्कळ नफा कमवायच्या मोहात व्यापाऱ्यांनी अक्षरश: नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे. आज शहरभर जे कोल्डड्रिंक, रसवंती, व ज्यूस सेंटर बघत आहोत, यात वापरला जाणारा बर्फ हा अखाद्य असून अमोनिया वायू, दूषित पाण्याद्वारे तयार करण्यात आला आहे.

शहरात बर्फ तयार करणाऱ्या जवळपास सात कंपन्या आहेत. परंतु यातील केवळ दोनच कंपन्या खाण्यासाठी वापरले जाणारे बर्फ बनवतात. ज्याचा पुरवठा फक्त "महागडी हॉटेल्स व बिअरबारमध्येच होत असल्याचे पुढे आले आहे.

उपराजधानीत कोल्डड्रींक, रसवंती, लिंबू सरबत, आइस्क्रीम व ज्यूस सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. बर्फाचा गोळेवाला अथवा सरबतवाला समोर आला तर त्याची चव चाखल्याशिवाय पुढे जावेसे वाटत नाही. मात्र, शहरात बर्फ तयार करणाऱ्या कंपन्या कुलिंग'साठीचाच अखाद्य बर्फ तयार करतात, केवळ दोन कंपन्या 'आईस क्यूब' तयार करतात. हा महागडा बर्फ असतो. यामुळे कुलिंगसाठी वापरण्यात येणारा बर्फच मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरला जात असल्याचे वास्तव आहे.

अखाद्य बर्फातील वायू घातकच

बर्फ बनविण्यापासून त्याच्यावर विविध प्रक्रिया केल्या जात असतात. बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो फार काळ टिकावा यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणावर अमोनियम वायूचा वापर केला जातो. त्याच्या जोडीला विविध वायूंचाही उपयोग होतो. हे सर्व वायू मानवी आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतात.

बर्फात मिसळतो गंज

बर्फाच्या लाद्या तयार करण्यासाठी जे साचे वापरले जातात, ते तीन थर दिलेल्या पत्र्याचे साचे वापरावेत, असा नियम आहे. परंतु, त्याची किंमत जास्त असल्यामुळे एक थर दिलेल्या पत्र्याचे साचे वापरले जातात. परिणामी, ते लवकर गंजतात आणि तो गंज बर्फाच्या पाण्यात मिसळू लागतो.

अस्वच्छ पाण्याचा बर्फ

बर्फ तयार करणाऱ्या कंपन्यांना नळाचे पाणी पुरत नाही. म्हणून काही जण खासगी टँकरचे पाणी वापरतात. तर काही कारखाने विहीर किंवा बोअरवेलचे पाणी वापरतात. हे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याची कोणतीही खातरजमा होत नाही. बहुसंख्य बर्फ हा अस्वच्छ पाण्यापासूनच तयार होतो.

Web Title: ice golas are tempting butharmful for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.