नागपूरच्या औद्योगिक वसाहतीतील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:26 PM2018-04-28T14:26:53+5:302018-04-28T14:27:05+5:30

रोकड लुटण्यासाठी एटीमएची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

ICICI Bank ATM in Nagpur industrial estate brokend by thief | नागपूरच्या औद्योगिक वसाहतीतील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडले

नागपूरच्या औद्योगिक वसाहतीतील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडले

googlenewsNext
ठळक मुद्देरोकड लुटण्याचा प्रयत्नएमआयडीसीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रोकड लुटण्यासाठी एटीमएची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. एमआयडीसीतील श्रमिकनगरात, रायसोनी कॉलेजच्या बाजूला आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. शुक्रवारी पहाटे तेथे लुटारू पोहचले. त्यांनी एटीएमच्या ज्या भागातून नोटा येतात, त्या पॅनलची तोडफोड करून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बरेच प्रयत्न करूनही आतमधील रोकड काढण्यात आरोपींना यश आले नाही. त्यामुळे ते रिकाम्या हाताने पळून गेले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेतर्फे योगेश श्रावण मानकर यांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार भारत क्षीरसागर यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी पोहचून लटारूंना शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. या प्रकरणी चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

निकामी सीसीटीव्ही
लाखोंची रोकड असलेल्या या एटीएममध्ये सुरक्षा रक्षकाची नेमणूक नाही. दुसरे म्हणजे, एटीएममध्ये दोन सीसीटीव्ही आहे. परंतु ते पोलिसांना तपासात मदत मिळेल, या कामाचे नाहीत. या सीसीटीव्हीमध्ये एटीएममध्ये होणा-या घडामोडी केवळ बँकेच्या मुंबई कार्यालयात लाईव्ह दिसतात. त्या रेकॉर्ड होत नाही. त्यामुळे या गुन्ह्यात नेमके किती लुटारू होते, ते किती वाजता एटीएममध्ये शिरले आणि किती वेळ त्यांनी चोरीचा प्रयत्न केला, त्याचे चित्रण रेकॉर्ड झालेले नाही.
 

 

Web Title: ICICI Bank ATM in Nagpur industrial estate brokend by thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम