इटलीतील कल्पना नागपुरात साकार

By admin | Published: May 15, 2017 02:33 AM2017-05-15T02:33:20+5:302017-05-15T02:33:20+5:30

व्हॉट्सअ‍ॅपवरील मॅसेज केवळ ‘चॅटिंग’ आणि ‘मनोरंजना’ साठीच नव्हे, तर ते किती उपयुक्त सुद्धा ठरू शकतात हे परत एकदा दिसून आले आहे.

The idea of ​​Italian realization in Nagpur | इटलीतील कल्पना नागपुरात साकार

इटलीतील कल्पना नागपुरात साकार

Next

‘वन टी फ्रॉम वॉल’ उपक्रम : ‘समाजऋण’ व्हॉट्सअ‍ॅप गु्रपचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्हॉट्सअ‍ॅपवरील मॅसेज केवळ ‘चॅटिंग’ आणि ‘मनोरंजना’ साठीच नव्हे, तर ते किती उपयुक्त सुद्धा ठरू शकतात हे परत एकदा दिसून आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर ‘समाजऋण’ नावाचा डॉ आशिष अटलोए संचालित ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी व उद्योजक असे सदस्य आहेत. या ग्रुपमध्ये इटलीमधील व्हेनिस शहरात असलेल्या कॉफी शॉपचे वर्णन होते. तेथे ‘वन कप कॉफी फ्रॉम वॉल’ हा उपक्रम आहे व त्यात एक कप कॉफी प्यायची व दोन कप कॉफीचे पैसे द्यायचे. एका कपची रिसिप्ट त्या वॉलवर लावली जाते. गरजू व जे कॉफी पैसे देऊन घेऊ शकत नाहीत ते सन्मानाने ‘वन कप कॉफी फ्रॉम वॉल’ अशी आॅर्डर देतात. ही संकल्पना डॉ आशिष अटलोए व संजय पांडे यांना आवडली व ‘समाजऋण’ ग्रुपतर्फे राबवायचे ठरवले. या अभिनव उपक्रमाची सुरुवात १३ मे रोजी साईराम फरसाण, कोतवाल नगर व साईराम फरसाण सोमलवाडा येथून करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक संजय पांडे, शिवाजी गायकवाड, डॉ आशिष अटलोए व इतर पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
अनेकदा काही मदत किंवा दान देण्याची इच्छा असते, पण नेमकी संधी मिळत नाही. चहा किंवा स्नॅक्स घेतल्यानंतर आगाऊ पैसे देऊन स्टीकर हॉटेलमधून घ्यायचे व ते स्टीकर पोस्टरवर लावायचे. ज्या गरजूस चहा किंवा स्नॅक्स पाहिजे त्यांनी फक्त ते स्टीकर काढून काऊंटरवर द्यायचे व सन्मानपूर्वक चहा, स्नॅक्सचा आस्वाद घ्यायचा. इतका सुटसुटीत हा उपक्रम आहे. गरिबांना व गरजूंना सन्मानपूर्वक अन्न व चहा मिळावा हा यामागचा उद्देश असून जनतेने या उपक्रमास हातभार लावून सहकार्य करावे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. पुढील काही दिवसांत शहरात अन्य हॉटेलमध्येही या उपक्रमाची सुरुवात मोठ्या प्रमाणात करण्यात येईल, असे यावेळी समाजऋण ग्रुपतर्फे जाहीर करण्यात आले.
या अभिनव व समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या पूर्वी समाजऋणतर्फे राज्यात पहिली ह्यनेकी की दीवार ह्य हा गरिबांना कपडे मोफत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम यशस्वीपणे सुरू करण्यात आला होता.

Web Title: The idea of ​​Italian realization in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.