३३० युनिटचा उपयोग केल्यास १६५ युनिटचे लागेल दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:13 PM2020-06-16T23:13:10+5:302020-06-16T23:15:06+5:30

मीटर रीडिंग व वीज बिलाच्या वितरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. वाढीव वीज बिल आल्याने ग्राहक महावितरणच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. दरम्यान महावितरणने स्पष्ट केले की, ग्राहकांना ‘स्लॅब बेनिफिट’चा लाभ देण्यात येत आहे. ग्राहकांना ३३० युनिट वापरल्याचे बिल आले असेल तर त्यांच्याकडून १६५ युनिट दराने बिलाची आकारणी करण्यात येणार आहे.

If 330 units are used, the rate will be 165 units | ३३० युनिटचा उपयोग केल्यास १६५ युनिटचे लागेल दर

३३० युनिटचा उपयोग केल्यास १६५ युनिटचे लागेल दर

Next
ठळक मुद्देमहावितरणने ‘स्लॅब बेनिफिट’ देण्याचा केला दावा : वाढत्या वीज बिलामुळे नागरिक त्रस्त

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : मीटर रीडिंग व वीज बिलाच्या वितरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. वाढीव वीज बिल आल्याने ग्राहक महावितरणच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. दरम्यान महावितरणने स्पष्ट केले की, ग्राहकांना ‘स्लॅब बेनिफिट’चा लाभ देण्यात येत आहे. ग्राहकांना ३३० युनिट वापरल्याचे बिल आले असेल तर त्यांच्याकडून १६५ युनिट दराने बिलाची आकारणी करण्यात येणार आहे.
लॉकडाऊनमुळे २३ मार्चनंतर मीटर रीडिंग व वीज बिल वाटण्याचे काम बंद करण्यात आले होते. या महिन्यापासून पुन्हा दोन्ही काम महावितरणने सुरू केले आहे. त्यामुळे ग्राहकांना दोन ते अडीच महिन्याचे बिल येत आहे. ज्या ग्राहकांनी गेल्या दोन महिन्यात पैसे भरले आहे, त्यांचे वीज बिल समायोजित करण्यात येत आहे. मात्र वीज बिलापोटी मोठी रक्कम भरावी लागत असल्याची ओरड ग्राहकांची आहे. दरम्यान महावितरणने दावा केला की, बिल दोन ते अडीच महिन्याचे आले असले तरी, ग्राहकांना स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. वीज बिलाची आकारणीसाठी शून्य ते १०० युनिट, १०१ ते ३०० युनिट याप्रमाणे टप्पे पाडण्यात आले आहे. कमी वीज वापरल्यास कमी बिल येते. मात्र ग्राहकांचा संशय आहे की महावितरणने वीज आकारणीचे जे टप्पे पाडले आहे, त्यानुसार बिल देण्यात आले नाही. महावितरणने ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन केले आहे. कॉम्प्युटराईज बिलात ग्राहकांना स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. फिक्स चार्ज, विद्युत शुल्क सोडून अन्य शुल्क समायोजित करण्यात येणार आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, प्रशासनाच्या परवानगीनंतरच सील असलेल्या वस्त्या सोडून इतर भागात मीटर रीडिंगचे काम सुरू आहे.

Web Title: If 330 units are used, the rate will be 165 units

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.