अमित शाह निर्दोष असतील तर निष्पक्ष चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 08:05 PM2018-03-31T20:05:59+5:302018-03-31T20:06:14+5:30

सरकारने मनात आणले तर कोणत्याही प्रकरणाचे सत्य सहज बाहेर येते. मात्र न्या. लोया यांच्या प्रकरणात सरकारला सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही, त्यामुळे संपूर्ण चौकशीमध्ये एकतर्फी दबाव आणण्यात आला. लोया यांच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर आहे व ते थेट भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी जुळलेले आहे. अमित शाह निर्दोष असतील तर निष्पक्ष चौकशीला भीती कशाची? त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शी चौकशी व्हावी, अशी मागणी कॅरव्हान पत्रिकेचे संपादक हरतोष सिंह बल यांनी केली.

If Amit Shah is innocent, then he should be given an impartial inquiry | अमित शाह निर्दोष असतील तर निष्पक्ष चौकशी व्हावी

अमित शाह निर्दोष असतील तर निष्पक्ष चौकशी व्हावी

Next
ठळक मुद्देन्या. लोया मृत्यूचे गूढ : हरतोष सिंह बल यांचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : सरकारने मनात आणले तर कोणत्याही प्रकरणाचे सत्य सहज बाहेर येते. मात्र न्या. लोया यांच्या प्रकरणात सरकारला सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही, त्यामुळे संपूर्ण चौकशीमध्ये एकतर्फी दबाव आणण्यात आला. लोया यांच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर आहे व ते थेट भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी जुळलेले आहे. अमित शाह निर्दोष असतील तर निष्पक्ष चौकशीला भीती कशाची? त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शी चौकशी व्हावी, अशी मागणी कॅरव्हान पत्रिकेचे संपादक हरतोष सिंह बल यांनी केली.
शनिवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीतील अनेक त्रुटी पत्रकारांसमोर मांडल्या. कॅरव्हान पत्रिकेने न्या. लोया यांच्या मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते. लोया यांच्या कुटुंबीयांशी अनेक दिवस चर्चा केल्यानंतरच याबाबत वृत्त प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ज्या रविभवन येथे न्या. लोया थांबले होते, तेथील प्रक्रियेत स्पष्टता नाही. रजिस्टरवर त्यांच्या नावाचा उल्लेख नाही. एका संवेदनशील प्रकरणातील न्यायमूर्ती येथे थांबले असताना आवश्यक प्रोटोकॉल देण्यात आला नाही. ज्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, तेथील तपासणीबाबतही तफावत दिसून येते. ईसीजी होता की नव्हता याबाबतही स्पष्टता नाही. शवविच्छेदन करतानाही सोबत असलेल्यांनी कुटुंबाशी संपर्क साधण्याऐवजी भलत्याशीच संपर्क साधल्याचे बल यांनी नमूद केले. त्यांचे शव घरी पोहचविले तेव्हा, रुग्णवाहिकेच्या चालकाऐवजी कुणीही सोबत नसल्याचा उल्लेख कुटुंबीयांनी केला होता. रविभवन येथे लोया यांच्यासोबत चार इतर जज असल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रकरणाच्या तपासणीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला, त्यामध्ये या चार न्यायमूर्तीचे बयान घेतल्याचा कुठेही उल्लेख नाही. उलट प्रत्यक्षदर्शी नसलेल्या न्यायमूर्तींचे बयान कसा घेतले, ही बाब समजण्यापलिकडे आहे. अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या नसताना २०१६ मध्ये प्रकरणच बंद करण्यात आले. एवढ्या संवेदनशील प्रकरणातील न्यायाधीशांच्या मृत्यूच्या चौकशीत दिसणारी तफावत अनाकलनीय असल्याचे मत हरतोष सिंह यांनी व्यक्त केले. लोया यांचा मुलगा अनुज याने कोणत्याही संस्थेवर भरोसा राहिला नाही, असा उल्लेख केला होता. त्यामुळे प्रकरणात नागरिकांची थेट निगराणी राहील आणि माध्यमांना बातम्या करण्याचे स्वातंत्र राहील अशाप्रकारे कोणत्याही संविधानिक संस्थेमार्फ त चौकशी व्हावी अशी मागणी बल यांनी केली. यावेळी प्राचार्य बबनराव तायवाडे उपस्थित होते.

Web Title: If Amit Shah is innocent, then he should be given an impartial inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.