व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्यास गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 08:17 PM2018-03-14T20:17:46+5:302018-03-14T20:18:04+5:30
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजना २०१७-१८ अंतर्गत नागपूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्केर्टिंग फेडरेशनमार्फत चणा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचाच चणा शासकीय हमीभावाने खरेदी करावयाचा आहे. कुठल्याही परिस्थितीत व्यापाऱ्यांकडून शासकीय केंद्रावर खरेदी होणार नाही, याची काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांकडून खरेदी झालेली आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजना २०१७-१८ अंतर्गत नागपूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्केर्टिंग फेडरेशनमार्फत चणा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचाच चणा शासकीय हमीभावाने खरेदी करावयाचा आहे. कुठल्याही परिस्थितीत व्यापाऱ्यांकडून शासकीय केंद्रावर खरेदी होणार नाही, याची काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांकडून खरेदी झालेली आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.
जिल्हा पणन अधिकारी यांच्या आदेशान्वये एफ.ए.क्यू. चणा रु. ४४०० (बोनससह) प्रति क्विंटल, आधारभूत दराने खालील चणा खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येईल. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आधारभूत भावाने शासकीय केंद्रावर विक्री करावयाची असल्यास तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संस्था व कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर (कळमना़), काटोल, उमरेड, भिवापूर, कळमेश्वर, सावनेर, नरखेड, रामटेक यांचे कार्यालयात संपर्क साधावा. सदर शासकीय आधारभूत चणा खरेदी केंद्रे वरील सर्व ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. चणा खरेदी ही संपूर्ण आॅनलाईन पध्दतीने करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून याकरिता शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत व ७/१२ चा पीक पेऱ्यासह उतारा असणे गरजेचे आहे. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर सदर नोंदणीनुसार शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे धान्य कृषी उत्पन्न बाजार समिती शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांवर विक्रीकरिता आणण्याचे दिनांक कळविण्यात येईल. वरील पध्दतीप्रमाणेच चणा खरेदी करण्यात येईल. चणा खरेदीचे पेमेंट आॅनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
कमी भावाने विक्री करू नका
कुठल्याही परिस्थितीत हमी भावापेक्षा कमी भावाने चना बाजारामध्ये शेतकऱ्यांनी विकु नये, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी डॉ. अतुल नेरकर यांनी केले. चन्याचा ओलावा १४ टक्के पर्यंत असावा, अशी अट दजार्बाबत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तुर स्वच्छ, वाळवुन, साफ करुन, एफ.ए.क्यु. दजार्चा चना विक्रीकरिता आणावा, असे डॉ. नेरकर यांनी सांगितले.