नागरिकांनी असेच सहकार्य केले तर लॉकडाऊन नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 08:20 PM2020-07-25T20:20:22+5:302020-07-25T20:21:48+5:30
महापालिका प्रशासन ,महापौर आणि लोकप्रतिनिधींच्या आवाहनानुसार नागरिकांनी शनिवारी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक गरज वगळता कुणीही घराबाहेर पडले नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनाही बंद आहेत. यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य केले, तर पुन्हा लॉकडाऊनची गरज भासणार नाही. पण कोरोना हद्दपार होईपर्यंत लढायचे आहे, असे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका प्रशासन ,महापौर आणि लोकप्रतिनिधींच्या आवाहनानुसार नागरिकांनी शनिवारी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक गरज वगळता कुणीही घराबाहेर पडले नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनाही बंद आहेत. यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य केले, तर पुन्हा लॉकडाऊनची गरज भासणार नाही. पण कोरोना हद्दपार होईपर्यंत लढायचे आहे, असे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.
जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी लोकांनी जी शिस्त व नियमाचे पालन केले ते यापुढेही कायम राहिले तरच आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकू. लॉकडाऊनची वेळ येणार नाही. लोकांसोबतच सर्व आस्थापनांनी आणि बाजारातील दुकानदारांनीही हीच जीवनशैली अंगिकारावी असे आवाहन मुंढे यांनी केले. दोन दिवसांपूर्वी बाजारपेठांचा फेरफटका मारला असता प्रचंड गर्दी दिसून आली. यापुढे तरी तरी लोकांनी असे करु नये, असे मुंढे म्हणाले.
... तर १५ दिवसाचा कर्फ्यू !
जनता कर्फ्यूत लोकांनी प्रशासनाला चांगली साथ दिली. अपेक्षा आहे की रविवारी हेच चित्र कायम असेल. मात्र कर्फ्यू संपल्यावर पुन्हा गर्दी केली तर १५ दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात येईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.