गर्दी टाळली नाही तर रेशीमबागचा बाजार बंद! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 11:23 PM2020-04-04T23:23:24+5:302020-04-04T23:25:09+5:30

रेशीमबाग मैदान बाजारात भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन केल्यानंतरही विक्रेते व नागरिक गर्दी करीत आहेत. येथील गर्दी न टाळल्यास हा बाजार बंद करण्याचा विचार मनपा प्रशासन करीत आहे.

If the crowd does not avoid, the market of Rashimbagh closes! | गर्दी टाळली नाही तर रेशीमबागचा बाजार बंद! 

गर्दी टाळली नाही तर रेशीमबागचा बाजार बंद! 

Next
ठळक मुद्देप्रशासनाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष : अंतर न ठेवताच भाजीपाला खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसचा संसर्ग होेण्याचा धोका विचारात घेता, शहराच्या मध्यवर्ती भागातील कॉटन मार्केट येथील भाजीबाजारात होणारी गर्दी विचारात घेऊन मार्केट बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. शहराच्या विविध भागात शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आल्या. यात रेशीमबाग मैदानाचाही समावेश आहे. परंतु या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन केल्यानंतरही विक्रेते व नागरिक गर्दी करीत आहेत. येथील गर्दी न टाळल्यास हा बाजार बंद करण्याचा विचार मनपा प्रशासन करीत आहे.
शहरातील गर्दी होणारे आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. परंतु नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नियमित भाजीबाजार सुरू ठेवण्यात आले आहेत. तसेच शहराच्या विविध भागातील मैदाने भाजी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत. यात रेशीमबाग मैदानाचाही समावेश होता. मात्र या बाजारात भाजीपाला खरेदी करताना नागरिकांकडून सोशल डिस्टन्स ठेवले जात नाही. विक्रे त्यांकडूनही यासाठी आग्रह धरला जात नाही. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास बाजार बंद करावा लागेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भाजी विक्रे त्यांच्या दुकानापुढे चुन्याच्या रेषा मारलेल्या आहेत. परंतु खरेदीसाठी येणारे नागरिक आखलेल्या रेषा ओलांडून गर्दी करतात. यात एखादा कोरोनाबाधित असला तर अनेकांना याची बाधा होण्याचा धोका आहे. याची जाणीव असूनही नागरिक खरेदीसाठी काही दुकानावर गर्दी करतात. प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्यानंतरही नागरिक त्याचे पालन करीत नसल्याने कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: If the crowd does not avoid, the market of Rashimbagh closes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.