... तर ताडाेबाचे ‘ते’ गेट वर्षभरासाठी बंद करणार; ताडाेबाच्या उपसंचालकांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 12:19 PM2022-03-30T12:19:00+5:302022-03-30T12:23:14+5:30

सफारी दरम्यान कोणत्याही पर्यटक वाहनात माेबाइल नेऊ नयेत यासाठी कठाेर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. यापुढे कोणतेही उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या परिक्षेत्रातील संबंधित प्रवेशद्वार एक वर्षासाठी बंद करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.

If drivers and guides violate the rules, the gates of the Tadoba project they are using will be closed for the rest of the year says management | ... तर ताडाेबाचे ‘ते’ गेट वर्षभरासाठी बंद करणार; ताडाेबाच्या उपसंचालकांचा इशारा

... तर ताडाेबाचे ‘ते’ गेट वर्षभरासाठी बंद करणार; ताडाेबाच्या उपसंचालकांचा इशारा

Next
ठळक मुद्देजिप्सीचालक,गाईडच्या माेबाइल संवादाने त्रस्त

संजय रानडे

नागपूर : ताडाेबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी करविणारे जिप्सीचालक व गाईडच्या माेबाइल वापराबाबत कठाेर इशारा प्रकल्प प्रशासनाने दिला आहे. वाघाची सायटिंग सांगण्यासाठी हाेणारा माेबाइलचा वापर वन्यजीवांना त्रासदायक ठरताे. त्यामुळे यापुढे चालक व गाईड यांनी माेबाइल वापरून नियमांचे उल्लंघन केले तर, ते वापरत असलेले प्रकल्पाचे गेट वर्षभरासाठी बंद करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.

ताडाेबाच्या बफर झोनमध्ये मोहुर्ली, पळसगाव,खडसांगी,शिवणी,चंद्रपूर आणि मूल या सहा रेंज आहेत. प्रकल्पाचे उपसंचालक (बफर झोन) जी. गुरुप्रसाद यांनी लोकमतला सांगितले, जिप्सी चालक आणि गाईड बंदी असतानाही माेबाइल बाळगतात. वाघ, बिबट्या किंवा आळशी अस्वल दिसल्यास ते इतर वाहनांना माहिती देतात. याचा परिणाम जिप्सींचा ओव्हरस्पीडिंग व गर्दी जास्त होते. अनेक वेळा त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती मिळाली आहे.

ही बाब लक्षात घेत सहाही रेंजच्या अधिकाऱ्यांना २१ मार्च २०२२ ला पत्र पाठविण्यात आले. सफारी दरम्यान कोणत्याही पर्यटक वाहनात माेबाइल नेऊ नयेत यासाठी कठाेर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. यापुढे कोणतेही उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या परिक्षेत्रातील संबंधित प्रवेशद्वार एक वर्षासाठी बंद करण्यात येतील,असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांना संवेदनशील करण्यास देखील रेंजर्सना सांगण्यात आले आहे.

टीएटीआरचे नियमित पाहुणे आणि वन्यजीव छायाचित्रकार अराफत सिद्दीकी यांनी जंगलात जिप्सी चालक आणि गाईडना मोबाइल फोन वापरण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. वाघ किंवा कोणताही प्राणी दिसणे ही संधीची बाब आहे. इतरांना घटनास्थळी बोलावून विनाकारण त्रास देणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. पर्यटकांचे वर्तनही चिंतेचा विषय आहे. मात्र एखाद्या पर्यटक वाहनात समस्या निर्माण झाली तर,माेबाइल उपयोगीही पडू शकतो. रिसाेर्ट चालकांनी मात्र या मुद्द्यावर बाेलण्यास नकार दिला.

ताडाेबाची नियमित सफारी करणारे अमित खापरे यांनी पर्यटकांना विचारात न घेता हा एकतर्फी निर्णय असल्याचे म्हटले. पर्यटक वाघ पाहण्यासाठी येतात. वनविभागाने एकतर्फी नियम लागू केल्यास गाईड आणि ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या गरीब गावकऱ्यांना त्रास होईल. व्यवस्थापनाने पर्यटनासाठी प्रत्येक गेटला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि जवळपासच्या गावांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार वाढवला पाहिजे.

Web Title: If drivers and guides violate the rules, the gates of the Tadoba project they are using will be closed for the rest of the year says management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.