सरकारने पाच वर्ष काम केले असते तर यात्रेची नामुष्की आली नसती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:40 AM2019-08-02T11:40:36+5:302019-08-02T11:47:06+5:30
सरकारने पाच वर्ष काम केले असते तर यात्रा काढण्याची नामुष्की आली नसती असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे शुक्रवारी (दि. २) सकाळी आयोजित पत्रपरिषदेत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सरकारने पाच वर्ष काम केले असते तर यात्रा काढण्याची नामुष्की आली नसती असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे शुक्रवारी (दि. २) सकाळी आयोजित पत्रपरिषदेत केले.
आपले अपयश लपवण्यासाठी मतांची भीक मागितली जाते आहे. त्याऐवजी लोकांची कामे करा असा सल्ला त्यांनी सत्ताधारी पक्षाला दिला.
शिवसेनेतून मिलिंद नार्वेकर यांचा २५ वेळेस आपल्याला फोन आल्याचे त्यांनी सांगितले. आपण त्यापैकी २३ वेळेस त्यांचा फोन उचलला नाही अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. नार्वेकरांनी मला सेनेत येण्याबाबत गळ घातली व कॅबिनेट मंत्रीपदाचे प्रलोभन दिल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. मात्र आपण कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरेंनी सरकारविरोधात आवाज उचलला आहे. ईडीची चौकशी लावून त्यांचा आवाज दाबू नये. निवडणूक आयोग कठपुतली झाली आहे. भाजपने विरोधी नेत्यांना सापळ्यात पकडले व त्यांची शिकार केली असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली.