जीवनाचा भाग झाल्यासच हिंदी भाषा वाचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:36 AM2020-02-11T11:36:49+5:302020-02-11T11:37:16+5:30
हिंदी भाषा आमच्या जीवनाचा भाग झाल्यास या भाषेचा प्रचार-प्रसार होऊन ही भाषा वाचेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक गीतांजली श्री यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जग झपाट्याने पुढे जात आहे. परंतु भाषा आणि साहित्याला थांबा पाहिजे. भाषेच्या बाबतीत नागरिक बेजबाबदार झाले आहेत. हिंदी भाषा आमच्या जीवनाचा भाग झाल्यास या भाषेचा प्रचार-प्रसार होऊन ही भाषा वाचेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक गीतांजली श्री यांनी केले.
प्रभा खेतान प्रकाशनच्या वतीने ‘कलम’ आपली भाषा आपले लोक या उपक्रमांतर्गत ‘लोकमत’ आणि एहसास वूमन आॅफ नागपूरच्या वतीने हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये आयोजित लेखक-वाचक संवादात त्यांनी मार्गदर्शन केले. गीतांजली श्री म्हणाल्या, आम्ही आपली भाषा सोडून केवळ इंग्रजीच्या मागे धावतो, ही शरमेची बाब आहे. आम्ही नवे साहित्य वाचत नाही, याची आम्हाला खंत वाटायला पाहिजे. त्यामुळे हिंदी भाषेला आपल्या जीवनाचा भाग करावा लागेल, असे त्या म्हणाल्या. संचालन परवीन तुली यांनी केले. मुलाखत मोनिका भगवागर यांनी घेतली. हॉटेल रेडिसन ब्ल्यूचे फ्रंट आॅफिस मॅनेजर संकेत आठवले यांनी स्मृतिचिन्ह देऊन गीतांजली श्री यांचा सत्कार केला.