खुनी ओळखीचा तर नव्हता ?

By admin | Published: September 8, 2016 02:19 AM2016-09-08T02:19:34+5:302016-09-08T02:19:34+5:30

आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्यावर गोळीबार करणारा युवक ओळखीचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

If the murderer was not familiar? | खुनी ओळखीचा तर नव्हता ?

खुनी ओळखीचा तर नव्हता ?

Next

पोलिसांच्या पत्रव्यवहारांना प्रतिसाद नाही
नागपूर : जगातील श्रीमंत क्रिकेट मंडळांपैकी एक असलेल्या ‘बीसीसीआय’कडून (द बोर्ड आॅफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) आयोजित क्रिकेट सामन्यांदरम्यान संरक्षणासाठी पोलीस विभागाची मदत घेण्यात येते. नागपुरात विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील क्रिकेट मैदानावर झालेल्या विविध सामन्यांच्या बंदोबस्ताचे सुमारे पावणेआठ कोटी रुपये थकीत आहेत. २०१० साली झालेल्या ‘आयपीएल’ सामन्यांच्या शुल्काचादेखील यात समावेश आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी जामठा येथे झालेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान घेण्यात आलेल्या पोलीस संरक्षणाबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. १ जानेवारी २०१२ ते ३० जून २०१६ या कालावधीत या मैदानावर झालेल्या किती सामन्यांत पोलीस दलाची सुरक्षा होती, किती पोलीस अधिकारी-कर्मचारी पुरविण्यात आले, पोलीस संरक्षण शुल्क किती होते व किती शुल्क थकीत आहे हे प्रश्न त्यांनी विचारले होते. नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या कालावधीत जामठा येथील क्रिकेट मैदानावर २०१० साली ‘आयपीएल’चे ३, २०१२ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना, २०१३ मध्ये भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी सामना, २०१५ सालचा भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका कसोटी सामना व २०१६ मध्ये ‘आयसीसी’ ‘टी-टष्ट्वेंटी’ विश्वचषकाच्या १० सामन्यांसाठी पोलीस संरक्षण पुरविण्यात आले होते. यातील २०१२ व २०१३ साली झालेल्या कसोटी सामन्यांसाठी ‘व्हीसीए’ने ५४ लाख ७२ हजार ७१० रुपयांचे संरक्षण शुल्क अदा केले. परंतु ‘आयपीएल’, २०१५ चा कसोटी सामना व २०१६ सालच्या विश्वचषकातील १० सामन्यांचे शुल्क अद्यापही भरलेले नाही. व्याजासह ही रक्कम ७ कोटी ७८ लाख ७८ हजार ४८९ इतकी होत आहे. (प्रतिनिधी)

चार वर्षांत आठ हजारांवर पोलिसांचे संरक्षण
२०१० ते २०१५ यापैकी २०११ वगळता इतर चार वर्षात जामठा येथे सामने झाले. या सामन्यांच्या संरक्षणासाठी थोडेथोडके नव्हे तर ८,४६३ पोलीस व्यस्त होते. यात ९३१ पोलीस अधिकारी व ७,५३२ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी सर्वात जास्त बंदोबस्त २०१० सालच्या ‘आयपीएल’ सामन्यांदरम्यान होता. यावेळी ६७९ पोलीस अधिकारी व ५,८०९ पोलीस कर्मचारी पुरविण्यात आले होते.

२०१० साली जामठा येथील क्रिकेट मैदानावर ‘आयपीएल’चे तीन सामने झाले होते. यात पोलिसांशिवाय राज्य राखीव मनुष्य बळाचादेखील वापर करण्यात आला होता. पोलीस संरक्षणाची रक्कम २ कोटी ४९ लाख ४१ हजार ८२५ इतकी होती. ही रक्कम अद्यापही थकीत आहे. यासंदर्भात तत्कालीन पोलीस अधीक्षक सी.एच.वाकडे, डॉ.मनोजकुमार शर्मा व डॉ.आरती सिंह यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. विदर्भ क्रिकेट असोसिएनशने ही रक्कम भरणे बंधनकारक असल्याचे त्यात नमूद होते. परंतु बंदोबस्त व सेवाशुल्काची रक्कम अद्यापही भरण्यात आलेली नाही.

Web Title: If the murderer was not familiar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.