नासुप्रला पुन्हा नियोजन प्राधिकरण केल्यास रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 01:10 AM2020-01-24T01:10:29+5:302020-01-24T01:11:46+5:30

नासुप्रची पुन्हा नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केल्यास याविरोधात शहरातील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा महापौर संदीप जोशी व भाजपचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रवीण दटके यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषेदत दिला.

If NIT become planning authority , we will come on the road | नासुप्रला पुन्हा नियोजन प्राधिकरण केल्यास रस्त्यावर उतरू

नासुप्रला पुन्हा नियोजन प्राधिकरण केल्यास रस्त्यावर उतरू

Next
ठळक मुद्देजोशी-दटके यांचा इशारा : पालकमंत्र्यांनी पत्र पाठविणे दुर्दैवी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराचा सत्यानाश करणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) बरखास्तीची प्रक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरू झाली. त्यानुसार नगर रचना विभाग महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे. असे असताना पालकमंत्री नितीन राऊत यांनी नासुप्रची पुन्हा नियोजन प्राधिकरण नेमणूक करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. नासुप्रची पुन्हा नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केल्यास याविरोधात शहरातील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा महापौर संदीप जोशी व भाजपचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रवीण दटके यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषेदत दिला.
नासुप्रने शहरातील रस्ते, नाले, मैदाने विकून खाल्ली, शहरातील नागरिकांना वेठीस धरले. चार ते पाच विश्वस्त निर्णय घ्यायचे. १ रुपया चौरस फूट दराने शासनाच्या जमिनी लाटण्यात आल्या. विशेष म्हणजे नासुप्रच्या अधिकार क्षेत्रातील ५७२ व १९०० आणि २३०० ले-आऊ ट भागात नगरसेवकांना विकास कामे करता येत नव्हती. शहरातील सर्वसामान्य नागरिकांची अडचण विचारात घेता, सर्वपक्षीय नगरसेवकांनी नासुप्र बरखास्त करण्याची मागणी केली होती. महापालिकेच्या प्रस्तावानुसार फडणवीस सरकारच्या काळात नासुप्र बरखास्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच पालकमंत्री नितीन राऊ त यांनी नासुप्रच्या पुनरुज्जीवनासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. त्या आधारे महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी अशोक खांडेकर यांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून, या प्रकरणाशी संबंधित स्वयंस्पष्टता अहवाल आदेश सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाविकास आघाडी सत्तेत येताच शहराचा सत्यानाश करणाऱ्या नासुप्रचे पुनरुज्जीवन करणे हे महाआघाडीचे महापाप ठरेल, असे दटके म्हणाले. नासुप्र शहरातील विकासाबाबत इच्छुक नाही. महापालिकेने वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही नासुप्रने १ लाख ९० हजार फाईल्सपैकी केवळ ५,७०० फाईल्स दिल्या. नासुप्र आजवर काँग्रेस नेत्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण राहिल्याचा आरोप संदीप जोशी यांनी केला.
महापालिका आयुक्तांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे अहवाल सादर करण्यापूर्वी तो सभागृहात चर्चेसाठी आणावा, त्याशिवाय तो शासनाकडे पाठवू नये, अशा आशयाचे पत्र महापालिका प्रशासनाला दिले असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

Web Title: If NIT become planning authority , we will come on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.