फास्टॅग नसेल तर द्यावा लागेला दुप्पट टोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:07 PM2019-11-12T23:07:09+5:302019-11-12T23:09:47+5:30

कॅशविना इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटकरिता १ डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य महामार्ग आणि शहरी टोल नाक्यावर फास्टॅगने टोल स्वीकारला जाणार आहे.

If not fastag, double the toll you have to pay | फास्टॅग नसेल तर द्यावा लागेला दुप्पट टोल

फास्टॅग नसेल तर द्यावा लागेला दुप्पट टोल

Next
ठळक मुद्देडिसेंबरपासून वाहनांवर फास्टॅग अनिवार्य : नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रोग्राम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॅशविना इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटकरिता १ डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य महामार्ग आणि शहरी टोल नाक्यावर फास्टॅगने टोल स्वीकारला जाणार आहे.
नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रोग्रामअंतर्गत केंद्र शासनाने १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व प्रकारच्या मोटर वाहनांवर फास्टॅग लावणे अनिवार्य केले आहे. ज्या वाहनांवर फास्टॅग राहणार नाही, त्या वाहनचालकाकडून दुप्पट टोल वसूल करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि एसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या महिन्यात डिसेंबरपासून फास्टॅग लागू करण्याची घोषणा केली होती.
काय आहे फास्टॅग?
फास्टॅग सिस्टिमच्या माध्यमातून वाहनांना टोल नाक्यावर न थांबता टोल चुकता करता येतो. याकरिता वाहनांवर फास्टॅग लावणे आवश्यक आहे. हा फास्टॅग अधिकृत टॅग जारीकर्त्या बँकांकडून खरेदी करता येतो.
असे करते काम
टोल नाक्यावर ऑटोमॅटिक ट्रान्सजेक्शनकरिता वाहनाच्या विंडस्क्रीनमध्ये फास्टॅग लावता येतो. यामध्ये रेडियो फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन लागले असते. वाहन टोल नाक्याजवळ जाताच सेन्सर टॅगला स्कॅन करतो. त्यानंतर फास्टॅग अकाऊंटमधून शुल्क कापले जाते. खात्यातील रक्कम संपल्यानंतर रिचार्ज करावा लागतो. फास्टॅगची वैधता पाच वर्षांची असते. अर्थात पाच वर्षांनंतर वाहनचालकांना दुसऱ्यांदा फास्टॅग लावावा लागतो.
या कागदपत्रांची आवश्यकता
फास्टॅगकरिता वाहनाची आरसी, वाहन मालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो, केवायसी कागदपत्रे आणि घराचा पत्ता असलेले एक कागदपत्र आवश्यक असते.
कशाप्रकारे करता येईल रिचार्ज?
कोणत्याही वाहनचालकाला आपल्या फास्टॅग अकाऊंटला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून रिचार्ज करता येते. फास्टॅग खाते कमीत कमी १०० रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेने रिचार्ज करता येऊ शकते. याशिवाय एसबीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस, पंजाब नॅशनल बँकांसह पेटीएमच्या माध्यमातून फास्टॅग अकाऊंट करता येते.
फास्टॅगचे फायदे
कारवर लागलेल्या फास्टॅगच्या मदतीने वाहनचालकांची वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. फास्टॅग एक पारदर्शी व्यवस्था आहे. त्यामुळे टोल नाक्यावर वाहतुकीची कोंडी होणार नाही. वाहनांमध्ये कोण बसले आहेत, त्याचीही माहिती मिळेल. त्यामुळे गुन्हे आणि गुन्हेगारांवर नियंत्रण येण्यास मदत मिळेल. फास्टॅगला जीएसटी नेटवर्क सोबत जोडण्यात आले आहे. या यंत्रणेत वाहनमालक आणि वाहनाची माहिती असल्याने ही यंत्रणा आधारच्या धर्तीवर काम करेल.
एवढेच नव्हे तर सर्व मार्ग फास्टॅगचे झाल्यास केवळ एकाच मार्गावर रोख स्वीकारली जाईल. फास्टॅगचा उपयोग करणाऱ्यांना कॅशबॅकचा फायदाही मिळू शकेल.
एसएमएसची सुविधा
फास्टॅग लागलेले वाहन कोणताही टोल नाक्यावरून जात असेल आणि चालकाच्या फास्टॅग खात्यातून रक्कम कापली जाताच वाहनचालकांच्या मोबाईलवर एक मॅसेज येईल आणि त्या माध्यमातून फास्टॅग अकाऊंटमधून किती रक्कम कापली, याची माहिती मिळेल.
या अडचणी केव्हा दूर होणार?
फास्टॅगमुळे वाहनचालकांना फायदा मिळेल. पण सध्या टोल नाक्यावर फास्टॅग संदर्भात ज्या अडचणी येत आहेत, त्यावर वाहनचालकांना खरंच दिलासा मिळेल का, हा प्रश्न गंभीर आहे. टोल नाक्यावर आताही नेटवर्कची समस्या नसल्यामुळे बहुतांशवेळी वाहनचालकांना थांबावे लागते. अनेक ठिकाणी कॅमेरे सुरळीत नसल्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचारी फास्टॅगला हाताने स्कॅन करताना दिसून येत आहेत. आताही नाक्यावर फास्टॅगचे मार्ग जास्त नसल्यामुळे फास्टॅग लागलेल्या वाहनांना काही टोल नाक्यावर समस्या येत आहे.

Web Title: If not fastag, double the toll you have to pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.