नाही तर डेंग्यूचा प्रकोप! घराघरांत डेंग्यूच्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:02 PM2018-08-27T23:02:07+5:302018-08-27T23:02:51+5:30

डेंग्यूमुळे नागपूरची जनता चांगलीच गारद झाली होती. तब्बल ६०१ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी एकट्या आॅगस्ट महिन्यात शहरात ५१ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने नुकत्याच केलेल्या तपासणीत ७०० वर घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. यामुळे प्रशासनानेच नव्हे तर नागरिकांनी तातडीने उपाययोजना न केल्यास डेंग्यूचा प्रकोप होण्याची भीती वर्तविली जात आहे.

If not, then dengue outbreak! In the every house dengue larvae | नाही तर डेंग्यूचा प्रकोप! घराघरांत डेंग्यूच्या अळ्या

नाही तर डेंग्यूचा प्रकोप! घराघरांत डेंग्यूच्या अळ्या

Next
ठळक मुद्दे२६ दिवसांत ५१ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यूमुळे नागपूरची जनता चांगलीच गारद झाली होती. तब्बल ६०१ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी एकट्या आॅगस्ट महिन्यात शहरात ५१ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने नुकत्याच केलेल्या तपासणीत ७०० वर घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. यामुळे प्रशासनानेच नव्हे तर नागरिकांनी तातडीने उपाययोजना न केल्यास डेंग्यूचा प्रकोप होण्याची भीती वर्तविली जात आहे.
डेंग्यूवर स्पष्ट उपचार नाही. अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषधही नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. यामुळे हिवताप व हत्तीरोग विभाग डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उन्हाळ्यापासूनच घराघरांची झाडाझडती घेणे सुरू करते. विभागाच्या चमूने जुलै महिन्यापर्यंत २७ हजार २८८ घरांची तपासणी केली. यात १२ हजार घरांत डेंग्यूचे डास व अळ्या आढळून आल्या. या तपासणीत दूषित घर व परिसरांमध्ये कीटकनाशक फवारणी केली. परंतु आॅगस्ट महिन्यात ज्या घरांमध्ये डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले त्या घरांची तपासणी केली असता शेकडोवर वस्त्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. यातच आॅगस्ट महिन्यात आतापर्यंत ५१ रुग्णांची नोंद झाल्याने हा विभाग हादरून गेला आहे.
३१ बालकांना डेंग्यू
जानेवारी ते आतापर्यंत डेंग्यूचे ७३ रुग्ण आढळून आले. यात १ ते १४ वर्षापर्यंतच्या वयोगटात २० मुले व ११ मुली अशा ३१ बालकांची नोंद आहे. १५ ते २४ वयोगटात १६ युवक व ८ युवतींना तर २५ ते ६० या वयोगटात १३ पुरुष व ५ महिलांना डेंग्यूचे निदान झाले आहे. बालकांमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

संशयित रुग्ण आढळल्यास फोन करा
आॅगस्ट महिन्यामध्ये केलेल्या तपासणीत घराघरांमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत, शिवाय ५१ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे लोकांनी आता पुढाकार घेत घरातील डासांच्या उत्पत्तीचे केंद्र नष्ट करणे आवश्यक झाले आहे. सोबतच घरात किंवा शेजाऱ्यांकडे डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आल्यास हिवताप व हत्तीरोग विभागाच्या ०७१२-२७३९०१७ या दूरध्वनीवर माहिती देऊन पत्ता सांगावा. यामुळे विभागाची चमू पोहोचून कीटकनाशक फवारणी करेल.
जयश्री थोटे
अधिकारी, हिवताप व हत्तीरोग विभाग


या वस्त्यांमधील घरात आढळून आला डेंग्यू

  •  झोन लक्ष्मीनगर: कोतवालनगर, अत्रे ले-आऊट, विवेकानंदनगर, वर्धा रोड, खामला, सुरेंद्रनगर, सोमलवाडा, नीरी कॉलनी, लक्ष्मीनगर, इंद्रप्रस्तनगर, गोपालनगर, जयताळा, सोनेगाव, परसोडी, स्वावलंबीनगर, प्रतापनगर, व्यंकटेशनगर, भामटी,
  •  धरमपेठ : रविनगर, सिव्हिल लाईन्स, सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स, काटोल रोड, हजारीपहाड, दाभा, सीताबर्डी, फ्रेन्ड्स कॉलनी, काटोल रोड, रामदासपेठ, धंतोली, शिवशक्तीनगर, तेलंगखेडी, रामनगर, हिलटॉप, शिवाजीनगर, सी.पी.डब्ल्यूडी क्वार्टर.
  • हनुमाननगर : महेशनगर चंदननगर, महावीरनगर, दुबेनगर रिंग रोड, विनायकनगर, न्यू नरसाळा, घाटे ले-आऊट, हुडकेश्वर, मानेवाडा, महालक्ष्मीनगर.
  •  धंतोली : न्यू कैलासनगर, मलीकनगर, मानेवाडा, उंटखाना, नाईकनगर, जोशीवाडी, मेडिकल चौक, नरेंद्रनगर, गणेशपेठ, चंद्रनगर, बारासिग्नल व इमामवाडा.
  •  नेहरुनगर : आशीर्वादनगर, नंदनवन, हुडकेश्वर, ओमनगर, सक्करदरा, दिघोरी, उमरेड रोड, सहकारनगर, शेषनगर, भांडे प्लॉट, चंद्रमणीनगर, वाठोडा ले-आऊट, अमोलनगर, वाठोडा.
  •  गांधीबाग : हज हाऊस, गंजीपेठ, धाडीवाल ले-आऊट, जुनी मंगळवारी, टिमकी, हंसापुरी, पाटलीपुत्र गंजीपेठ, इतवारी, भालदारपुरा, महाल, नवाबपुरा, मोमीनपुरा, लकडगंज, न्यू शुक्रवारी, गांधीबाग, जागृती कॉलनी.
  • सतरंजीपुरा : पांचपावली, तांडापेठ, तुळशीनगर, इतवारी रेल्वे स्टेशन, बिनाकी ले-आऊट, शांतीनगर, कावरापेठ, दुर्गानगर, श्रीनाथ साईनगर, लकडगंज, मेहंदीबाग, प्रेमनगर.
  • लकडगंज : गुलशननगर, कळमना, भवानीनगर, पारडी, वर्धमाननगर, वैष्णवदेवीनगर, नेताजीनगर, डिप्टीसिग्नल, बगडगंज, भरतवाडा पारडी, हिवरी ले-आऊट, मिनीमातानगर, भांडेवाडी, सतनामीनगर.
  •  आशीनगर : टेका न्यू वस्ती, जवाहरनगर, क्रिष्णा कावळेनगर, विनोबा भावेनगर, सुगतनगर, टेका-नाका, मिलिंदनगर, दीक्षितनगर, लष्करीबाग, जरीपटका
  •  मंगळवारी : गोरेवाडा, झिंगाबाई टाकळी, बेझनबाग, लुंबिनीनगर, मानकापूर, जुना मानकापूर, गीट्टीखदान, नवीन मानकापूर, गोधनी.

 

Web Title: If not, then dengue outbreak! In the every house dengue larvae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.