जनतेच्या हिताची चिंता असेल तर काँग्रेसने सरकारबाहेर पडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:08 AM2021-01-21T04:08:36+5:302021-01-21T04:08:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : थकीत वीज बिल भरले नाही तर जोडणी कापण्यात येईल, असा इशारा महावितरणकडून देण्यात येत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थकीत वीज बिल भरले नाही तर जोडणी कापण्यात येईल, असा इशारा महावितरणकडून देण्यात येत आहे. ‘लॉकडाऊन’च्या कालावधीतील वीज बिलात सवलत देणार अशा वारंवार घोषणा करून सरकारमधील मंत्र्यांनीच जनतेच्या अपेक्षा वाढविल्या. आता वीज कापण्याचा इशारा देऊन कोट्यवधी जनतेच्या अपेक्षांवरच प्रहार केला आहे. काँग्रेस पक्षाला जनतेच्या हिताची चिंता असेल, तर त्यांनी तात्काळ सरकारबाहेर पडावे, असे प्रतिपादन भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी केले.
सरकारने वारंवार सवलतीचे आश्वासन जनतेला दिल्यामुळेच वीज ग्राहकांनी आजपर्यंत बिलाचा भरणा केलेला नाही आणि त्यामुळेच वीज बिल थकबाकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शासनाने एस.टी. महामंडळाला मदत केली होती. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी अनेकदा घोषणा केल्या. कधी १०० युनिट माफ, कधी ५० टक्के बिल माफ व अन्य अनेक सवलतींच्या घोषणा केल्या. मात्र, आता ऊर्जामंत्री वीज बिलांबाबत गप्प बसले आहेत. यावरून काँग्रेसच्या मंत्र्यांचे किती वजन या सरकारमध्ये आहे, हे लक्षात येते. मंत्र्यांना केवळ खुर्च्या सांभाळायच्या आहेत का, असा सवाल खोपडे यांनी केला.