कोरोनाची लाट पुन्हा परत आलीच तर प्रशासन पूर्णपणे सज्ज :  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 07:00 PM2020-10-13T19:00:00+5:302020-10-13T19:02:22+5:30

Collector Ravindra Thakre, media, Corona Virus सध्या नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. मृत्यूसंख्याही कमी झाली आहे. हे चांगले चित्र आहे. जगभरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचेे काही उदाहरणे आहेत. आपल्याकडे तसे होऊ नये, अशीच अपेक्षा आहे. परंतु जर असे झालेच तर यावेळी प्रशासन पूर्णपणे सज्ज व तयार आहे, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.

If the wave of corona comes back, then the administration is fully prepared: Collector Ravindra Thakre | कोरोनाची लाट पुन्हा परत आलीच तर प्रशासन पूर्णपणे सज्ज :  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

कोरोनाची लाट पुन्हा परत आलीच तर प्रशासन पूर्णपणे सज्ज :  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

Next
ठळक मुद्देआतापर्यंतच्या अनुभवातून बच्याच गोष्टी कळल्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सध्या नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. मृत्यूसंख्याही कमी झाली आहे. हे चांगले चित्र आहे. जगभरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचेे काही उदाहरणे आहेत. आपल्याकडे तसे होऊ नये, अशीच अपेक्षा आहे. परंतु जर असे झालेच तर यावेळी प्रशासन पूर्णपणे सज्ज व तयार आहे, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.

वनामती येथे मंगळवारी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकरी योगेश कुंभेजकर, डॉ. अविनाश गावंडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले की, मागील मार्च महिन्यापाासून डॉक्टरांसह प्रशासनातील सर्व यंत्रणा केवळ कोरोनाच्या कामात लागलेली आहे. सुरुवातीला हा आजार नवीन असल्याने अनेक गोष्टी नवीन होत्या. त्यामुळे अडचणी आल्या. कोरोनाची रुग्णसंख्या व मृत्यूचा दर वाढला. परंतु आता परिस्थिती हळुहळू सुधारत आहे. मृत्यूदर कमी झाला असून रुग्णसंख्याही कमीकमी होत आहे. ही चांगली बाब आहे. आता आपण सर्वांनी आपली काळजी घ्या व आपापली कामे सुरु करा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोना पुन्हा परत आलाच तर आता आम्ही सज्ज आहोत. कारण इतक्या दिवसांचा, महिन्यांचा अनुभव आमच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांनी कोराोनाचा संसर्ग वाढू नये, यादृष्टीने अनेक उपाययोजना सुचवल्या. त्याची नोंद घेऊन अंमलबजावणी करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

माझे क्षेत्र माझा पुढाकार

राज्य शाासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी यावर नागपूर जिल्ह्यात माझे क्षेत्र माझा पुढाकार हे अभियान राबविले जात आहे. यात सरपंचापासून तर तलाठ्यापर्यंत व ग्रामपंचयत सदस्यांना प्रशासनााने एक पत्र दिले आहे यात कोरोनापाासून घ्यावयाची काळजी व इतर आवश्यक जनजागृतीची माहिती देण्यात आली आहे. यासोबत या पत्रात कोरोनासंबंधी डॉक्टरांपाासून तर रुग्णालयापर्यंत आवश्यक असलेल्यांची नावे व त्यांचे मोबाईल नंबर देण्यात आले आहे. जेणेकरून गावपाातळीवर लोकांना मदत करता येईल.

Web Title: If the wave of corona comes back, then the administration is fully prepared: Collector Ravindra Thakre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.